मुंबई : झी मराठीवरील लोकप्रीय मालिका ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेचा तिसऱा भाग सोमवारीच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मागील दोन पर्वाप्रमाणेच तिसऱ्या मालीकेतील गुढ कथानक प्रेक्षकांना नक्कीच भावेल असा विश्वास मालिकेच्या निर्मात्यांना वाटत आहे. दरम्यान सगळीकडे आण्णा नाईक परत येणार या प्रोमोने चांगलाच धुमाकूळ घातलेला आहे. मात्र यादरम्यान मालिकेच्या चाहत्यांना एकच प्रश्न सतावत होता.
मालिकेतील शेवंता ‘रात्रीस खेळ चाले’ मध्ये परत येणार का हा प्रश्न सर्व चाहत्यांना सतावत होता. या मालिकेतील आण्णा नाईक पाठोपाठ लोकप्रीय कोणते पात्र असेल तर ते शेवंताचे पात्र होते. मात्र शेवंता परत येणार का या प्रश्नाचे उत्तर हे पात्र साकारत असलेली अभिनेत्री अपुर्वा नेमळेकरने शेवंताचा लाल साडीतील फोटो शेअर करत ‘भेटूया लवकरच’ असे म्हणत आपल्या चाहत्यांना खुशखबर दिली आहेत. यानंतर आण्णा नाईक आणि शेवंता ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करायला तयार आसल्याची खात्री झाली.
२०१६ वर्षापासून सुरु असलेल्या ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेचे आतापर्यंत दोन भाग येऊन गेलेले आहेत. कोकणातील एका गावातील वाड्यात राहणारे नाईक कुंटूंबावर आधारित ही मालिका आहे. या मालिकेतील मालवणी भाषा प्रेक्षकांच्या आकर्षणाचे प्रमुख कारण ठरली. आण्णा नाईक सोबत आण्णाची बायको, माधव, दत्ता, नीलीमा, सरिता, छाया ही पात्रही चांगलीच लोकप्रिय ठरली. मात्र शेवंताचे पात्र सर्वाधिक लोकप्रीय ठरले. तिसऱ्या भागातील कथानक काय वळण घेईल हे येणारा काळच सांगेल.
महत्वाच्या बातम्या
- ६४ दिवसांत निकाल! चिमुकलीवर अत्याचार करून खून, आरोपीला फाशी
- परभणीत २७० रुग्णांची वाढ, पाच जणांचा मृत्यू
- देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली माहिती ही धादांत चुकीची; जयंत पाटील कडाडले
- काँग्रेस आणि भाजपाच्या आश्वासनांमध्ये हमी व जुमल्यांइतकाच फरक : अशोक चव्हाण
- मेल्ट्रोनमधील दीडशे बेड लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी राखीव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

