🕒 1 min read
सांगली : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटर बॉम्ब टाकल्यामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर पुन्हा एक मोठा प्रहार केला आहे. मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलीस दलातील बदल्यांमध्ये झालेल्या हेरफाराबद्दल महाविकास आघाडी सरकारवर आरोप केले आहेत.
एवढच नाही तर त्यांनी पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटचे पुरावे घेऊन दिल्ली गाठली. त्यांनी केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली व हे पुरावे त्यांच्याकडे सुपूर्द केले आहेत. दरम्यान, देवेंद्र फडणवीसांचे हे सर्व आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांनी फेटाळून लावले आहेत. ‘राज्यातील सगळ्या बदल्या या अस्थापणा बोर्डाने केल्या आहेत. फडणवीसांकडील अहवाल चुकलेला आहे. त्यांनी दिलेली माहिती ही धादांत चुकीची आहे,’ असं जयंत पाटील यांनी प्रत्यत्तर दिलं आहे.
फोन टॅपिंगचा अधिकार फडणवीसांना कोणी दिला ?
‘जेव्हा देशाची सुरक्षितता धोक्यात असते किंवा एखादा गुन्हा उघडकीस केला जात असेल तेव्हा लोकांचे फोन टॅपिंग केले जाते. मात्र, संकेत पायदळी तुडवून कोणाच्या आदेशाने लोकांच्या कॉलचे रेकॉर्डिंग केले? तसेच, लोकांचं संभाषण टॅप करण्याचा हा अधिकार यांना कोणी दिला?’ असा सवाल देखील जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे.
फडणवीसांकडे असलेल्या ६.३ जीबीचा डेट्याने महाविकास आघाडी अडचणीत ?
‘पोलीस दलातील गैरप्रकार व बदल्यांच्या रॅकेटबद्दल तक्रार करणारे परमबीर सिंग हे पहिले अधिकारी नाहीत. त्याआधीच्या पोलीस महासंचालकांनीही पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटच्या संदर्भात एक अहवाल राज्य सरकारला दिला होता. माझ्याकडं त्यावेळच्या गुप्त अहवालाची प्रत आहे. याशिवाय, ६.३ जीबीचा डेटा आहे. त्यात सर्व प्रकारच्या संभाषणाचा पुरावा आहे,’ असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- डिजिटल माध्यम क्षेत्रात ‘महाराष्ट्र देशा’ची गरुडझेप…
- ‘ओबीसींसाठी ओबीसी मंत्री, मराठ्यांसाठी मराठा मंत्री मग दलित-मागास वर्गासाठीच अजित पवार का ?’
- …अन् विश्वविक्रमी खेळीनंतर पांड्या बंधूंसाठी भावुक क्षण; कृणालला आनंदाश्रू झाले अनावर
- अधिकाऱ्यांना हाताशी धरून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न फडणवीस हे करत आहेत ?
- परमबीर सिंह यांच्या याचिकेवर उद्या सुनावणी होणार; देशमुखांच्या अडचणी वाढणार ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

