परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार खुप मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. मंगळवारी 270 कोरोनाबाधीत आढळले आहेत. तर पाच कोरोनाबाधीतांचा मृत्यू देखील झाला आहे. तर 52 कोरोनामुक्त व्यक्तींना सुट्टी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
रुग्णालयातील कक्षात एक हजार 23 कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत 358 कोरोनाबाधित व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यामध्ये आजपर्यंत 11 हजार 281 कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या आहेत. त्यापैकी 9 हजार 900 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. सरकारी रुग्णालयातर्फे आतापर्यंत 1 लाख 52 हजार 537 व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले आहे. त्यात 1 लाख 40 हजार 676 व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले आहेत.
11 हजार 128 व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह, 593 अनिर्णायक व 140 नमुने नाकारल्या गेले असल्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी प्रसिध्द केलेल्या प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळवले आहे. जिल्हा प्रशासन तसेच पोलिस आणि आरोग्य विभागाकडून कोरानाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर करावा, विनाकारण कोणीही रस्त्यावर फिरु नये, सॅनेटायझरचा नियमीतपणे वापर करावा तसेच सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे तसेच ताप, खोकला, सर्दी आदी लक्षणे असतील तर कोरोनाची चाचणी तसेच योग्य त्या डॉक्टरांना दाखवून उपचार करुन घेण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- स्वतःला वाघ म्हणवणारे ठाकरे आता पवारांच्या ताटाखालचं मांजर झालेत – भाजप
- सत्ता येताच भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात टाकणार; अमित शहांची बंगालमध्ये घोषणा
- बँक ग्राहकांसाठी महत्वाची बातमी महिना अखेरीस तब्बल ‘इतक्या’ दिवस बँका बंद
- इंग्रजी शिकविण्याच्या मुद्द्यावरून शशी शरूर यांचा पारा चढला
- धनंजय मुंडे यांच्या इशार्यानंतर प्रशासन लागले कामाला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

