Share

…अन् विश्वविक्रमी खेळीनंतर पांड्या बंधूंसाठी भावुक क्षण; कृणालला आनंदाश्रू झाले अनावर

Published On: 

🕒 1 min read

पुणे : पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेनंतर आता भारत आणि इंग्लंडच्या क्रिकेट संघांमध्ये एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेची सुरुवात झाली आहे. या मालिकेत होणारे तीनही सामने पुण्यातील एमसीए (गहुंजे) स्टेडियमवर खेळवले जात आहेत. दरम्यान, पहिल्या एकदिवसीय सामन्यातील भारतीय संघाची फलंदाजी संपली आहे.

भारत ३०० धावांचा टप्पा पार करेल कि नाही अशी शंका होती. मात्र, कृणाल पांड्या आणि के एल राहुल या जोडीने केलेल्या खेळीमुळे भारताला ३१७ धावांचा डोंगर इंग्लंडच्या संघासमोर रचता आला आहे. यात, कृणाल पांड्याने पदार्पणातील एकदिवसीय सामन्यात मोठ्या विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे.

कृणालने एकदिवसीय पदार्पणात वेगवान अर्धशतक झळकावण्याची कामगिरी केली आहे. कृणालने इंग्लंडच्या जॉन मॉरीस यांचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. मॉरीस यांनी 1990 मध्ये 35 चेंडूत अर्धशतक झळकावलं होतं. तर कृणालने 26 चेंडूत वेगवान अर्धशतक पूर्ण केलं. कृणालने एकूण 31 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 58 धावांची खेळी केली आहे.

दरम्यान, या खेळीनंतर हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांच्यासाठी खूप मोठा भावुक क्षण होता. कारण, काहीच महिन्यांपूर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. या दुःखातून सावरून हे दोन्ही खेळाडू भारतीय संघासाठी चमकदार कामगिरी करत आहेत. पदार्पणात सामन्यातच विश्वविक्रमी खेळी केल्यानंतर कृणालला रडू कोसळलं आहे. बीसीसीआयने देखील हा भावुक व्हिडीओ शेअर केला आहे. यात, कृणाल आपल्या धाकट्या भावाच्या म्हणजेच हार्दिकच्या गळ्यात पडून रडताना दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!