औरंगाबाद : महापालिकेच्या शासकीय तंत्रनिकेतन कोविड सेंटरमध्ये दोन दिवसांपूर्वीच तरुणीचा विनयभंग झाल्याचा प्रकार समोर आला होता. यानंतर पालिकेच्या अधिकार्यांनी पाहणी केली. त्यांच्या सूचनेवरून वरच्या मजल्यावरील महिला रुग्णांना खालच्या मजल्यावर शिफ्ट करण्यात आले. येथे सीसीटीव्ही सुरक्षा असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कोरोना रूग्णांची संख्या वाढत असताना आरोग्य सेवा पुरवण्यात पालिकेच्या यंत्रणेची धावपळ उडाली आहे. यातच कोविड सेंटर मध्ये विविध प्रकारच्या समस्या निर्माण होत असल्याने सेवा पुरवताना अधिकार्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.
यातच मागील महिन्यात पद्मपुरा कोविड सेंटर मध्ये महिलेचा विनयभंग झाल्याचा प्रकार घडल्याने त्याची चर्चा राज्याच्या अधिवेशनापर्यंत पोहचली. त्यानंतर दोन दिवसांपूर्वीच पॉलिटेक्निक कोविड सेंटरमध्ये तरुणीने विनयभंगाची तक्रार पालिकेकडे केली होती. त्यावर पालिकेने कळवल्यानंतर उस्मानपुरा पोलिसांनी भेट देत रुग्णांची ओळख परेड केली.
त्यात कुणी आढळले नाही. त्यामुळे आता अधिकार्यांच्या सूचनेवरून पालिकेच्या अधिकार्यांनी महिलांचा वॉर्ड खालच्या मजल्यावर हलवला आहे. तेथे सिसिटीव्ही कॅमेरे बसवण्यात आल्याने कोणतीही गैरसोय अथवा पुन्हा असा प्रकार घडणार नाही, असे मत अधिकार्यांनी व्यक्त केले.
महत्त्वाच्या बातम्या
- आता ‘या’ रुग्णांना मिळणार टप्प्याटप्प्याने सुट्टी
- पंतप्रधानांच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या १४ दहशतवाद्यांना मृत्यूदंड
- होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांची फोनवरुन विचारपूस
- येलदरी @ ६९, परभणीसह तीन जिल्ह्याची तहान भागवणार
- मुख्यमंत्र्यांची ‘ती’ मागणी अखेर मान्य; उद्धव ठाकरेंनी मानले मोदींचे जाहीरपणे आभार


