🕒 1 min read
औरंगाबाद : कोरोनाची लक्षणे नसलेल्या तसेच रुम एअरवर असलेल्या रुग्णांना आता घाटी रूग्णालयातून महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये हलविण्याऐवजी टप्प्या-टप्प्याने सुट्टी दिली जाणार आहे. अशाच ३० रुग्णांना सोमवारी घाटीतून सुट्टी देण्यात आली आहे. तर यापुढे गंभीर रुग्णांनाच प्राधान्याने दाखल करून घेतले जाईल, असा निर्णय घाटी प्रशासनाने घेतला आहे.
मार्च महिन्यापासून कोरोनाचा शहरात उद्रेक झाला आहे. ५ मार्चपासून कोरोना रूग्णांत सतत वाढ होत चालली आहे. महिनाभरापूर्वीच जिल्ह्यात रोजचे २० ते २५ कोरोना रूग्ण निघायचे. मात्र मागील पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात दररोज हजारपेक्षा अधिक रूग्ण निघत आहेत.
शहरात वाढत्या रूग्णसंख्येमुळे उपचारासाठी बेड्सच्या कमतरतेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना रूग्णांना त्यांच्या राहत्या घरीच होम आयसोलेशन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
तसेच घाटीतील रुम एअरवर असलेल्या रुग्णांना महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये हलविण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यादृष्टीने रविवारपासून रुग्णांच्या नातेवाइकांचे समुपदेशन करण्यास सुरुवात झाली आहे. पण रुग्ण जर रुम एअरवर असेल तर रुग्णालयातून सुट्टी द्यावी. अन्यथा होम आयसोलेशनमध्ये रुग्णाला ठेवण्यात यावे, अशी मागणी नातेवाइकांनी पुढे केली आहे.
त्यामुळे या मागणीचा घाटी प्रशासनाने सकारात्मकरित्या विचार करून अशा रुग्णांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, आता रोज आयसीएमआरच्या गाईडलाईननुसार रुग्णांना सुट्टी देऊन लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या कमी केली जाणार आहे, असेही डॉ. कैलास झिने म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- पंतप्रधानांच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या १४ दहशतवाद्यांना मृत्यूदंड
- होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांची फोनवरुन विचारपूस
- येलदरी @ ६९, परभणीसह तीन जिल्ह्याची तहान भागवणार
- मुख्यमंत्र्यांची ‘ती’ मागणी अखेर मान्य; उद्धव ठाकरेंनी मानले मोदींचे जाहीरपणे आभार
- मोठी बातमी : उद्धव ठाकरेंकडे भेटायला वेळ नाही, नाराज नरेंद्र पाटलांनी शिवसेना सोडली…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

