परभणी : जिल्हामधील जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणामध्ये सध्या ६९. ६८ टक्के जिवंत जलसाठा असल्याची माहिती समोर आली आहे. या जलसाठ्यामध्ये येणारा पुर्ण उन्हाळ्याच्या पाण्याचे नियोजन सिंचन विभाग करणार आहे. तर मागच्या वर्षी खुप चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्याने येलदरी धरण तब्बल सहा वर्षांनंतर १०० टक्के भरले होते.
तर मागच्या वर्षी येलदरी धरण अनेक वेळा आेव्हर फ्लो झाले होते. त्यामुळे हे पाणी नदीमध्ये देखील सोडावे लागले. धरण शंभर टक्के भरल्याने पाण्यावर वीज निर्मिती देखील करणे सुरु केले आहे. ६७ टक्के जलसाठा उपलब्ध असल्याने परिसरातील गावांची पिण्याच्या पाण्याची चिंता संपली आहे. तर परभणी शहरासह जिल्हा तसेच हिंगोलीसह नांदेड जिल्हामधील अनेक गावांना या धरणातुन पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. शहरासह ग्रामीण भागामध्ये असलेले अडीचशे पेक्षा अधिक जलपुरवठा योजना या प्रकल्पावर आधारीत चालत आहे.
दरवर्षी मात्र या धरणामध्ये खुप कमी पाणी पुरवठा असल्याने मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच पाण्याची खुप मोठ्या प्रमाणात टंचाइ निर्माण हाेते. परंतू आता मुबलक प्रमाणात जलसाठा असल्याने पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी लागणारा पाणीपुरवठा करणे देखील या मुळे शक्य झाले आहे. एकुण ६८८ दलघमी एकुण जलसाठा क्षमता असलेल्या या प्रकल्पामध्ये सध्या ५६४.२८७ दलघमी एवढे पाणी धरणात उपलब्ध आहे. त्यामुळे जलसाठ्याची ६९. ६८ टक्के एवढी झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- स्वतःला वाघ म्हणवणारे ठाकरे आता पवारांच्या ताटाखालचं मांजर झालेत – भाजप
- सत्ता येताच भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात टाकणार; अमित शहांची बंगालमध्ये घोषणा
- बँक ग्राहकांसाठी महत्वाची बातमी महिना अखेरीस तब्बल ‘इतक्या’ दिवस बँका बंद
- इंग्रजी शिकविण्याच्या मुद्द्यावरून शशी शरूर यांचा पारा चढला
- धनंजय मुंडे यांच्या इशार्यानंतर प्रशासन लागले कामाला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

