🕒 1 min read
औरंगाबाद : प्रशासनाने कोरोना रुग्णांसाठी बेड वाढवले आहेत. एकीकडे प्रशासन प्रामाणिकपणे रुग्णांचा विचार करतांना दिसत आहे तर दुसरीकडे अजूनही याच प्रशासनातील घटकांद्वारे रुग्णांची अडवणूक आणि पिळवणूक करण्याचे प्रकार सुरु आहेत. कोरोना रुग्णांसाठी शहरात बेड्स उपलब्ध नसल्याचे सांगून चक्क या बेड्सची दलाली होत असल्याचे झणझणीत वास्तव महाराष्ट्र देशाने सोमवारी (दि.२२) प्रसिद्ध केले होते. त्यानंतर प्रशासनाने एकुण ६०१४ खाटा उपलब्ध करुन दिल्या आहेत. मात्र रुग्णांची अडवणूक आणि पिळवणूक करणाऱ्या मानसिकतेवर जरब कोण बसवणार? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
बेड्स नसल्याचे सांगत खाजगी रुग्णालयांच्या माथी रुग्ण मारले जात आहेत. पैसे फेका आणि सुविधा घ्या असाच एकंदरीत प्रकार सर्वत्र सर्रास सुरु आहेत. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची मोठी आर्थिक लूट होत असल्याचे समोर आले आहे.
जिल्हा प्रशासनाने रुग्णांच्या व्यथा समजून घेत जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागात पुरेशा प्रमाणात खाटा उपलब्ध ठेवण्यासाठी काल तातडीने आदेश दिले आहेत. त्यानुसार एकुण ६०१४ खाटा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.
मागील काही दिवसांत जिल्ह्यात दररोज एक हजारपेक्षा अधिक कोरोना रूग्ण आढळत असल्याने आरोग्य यंत्रणेतील उपलब्ध बेड्स कमी पडत आहेत. मागील काही दिवसांत कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट हा १५ वरून थेट ३२ टक्क्यांवर पोहचला आहे.
यावरून शहरात कोरोनाचा संसर्ग किती गतीने पसरतो आहे, याची प्रचिती येते. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागात पुरेशा प्रमाणात खाटा उपलब्ध ठेवण्यासाठी प्रशासनाने यंत्रणांना निर्देशित केलेले आहे.
शहरी भागात सीसीसी, डिसीएच आणि डीसीएचसी या उपचार सुविधांमध्ये एकुण ६०१४ खाटा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. तर ग्रामीण भागात सीसीसीमध्ये १२४४, डीसीएचसीमध्ये २२५ खाटा उपलब्ध आहेत. तसेच वाढत्या रूग्णसंख्येच्या प्रमाणात अतिरिक्त उपचार सुविधा, खाटांची उपलब्धता प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘या’ कारणामुळे खासदार गिरीश बापट यांनी लिहले पंतप्रधान मोदींना पत्र
- ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण होणार केंद्रीय मंत्री जावडेकरांची माहिती
- परभणी जिल्हा बँकेत वरपुडकर गटाचे वर्चस्व
- ‘कोरेगाव भिमाच्या दंगलीवेळी दंगलखोरांना क्लीनचिट देण्यात रश्मी शुक्ला यांचा सिंहाचा वाटा’
- ‘कोरेगाव भिमाच्या दंगलीवेळी दंगलखोरांना क्लीनचिट देण्यात रश्मी शुक्ला यांचा सिंहाचा वाटा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

