🕒 1 min read
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटर बॉम्ब टाकल्यामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर पुन्हा एक मोठा प्रहार केला आहे. मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलीस दलातील बदल्यांमध्ये झालेल्या हेरफाराबद्दल महाविकास आघाडी सरकारवर आरोप केले आहेत.
देवेंद्र फडणवीस हे आज दिल्लीला जाणार असून पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटचे पुरावे केंद्रीय गृहसचिवांना देणार आहेत. या संपूर्ण प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी फडणवीस करणार आहेत. याबबातची माहिती फडणवीस यांनी दिली आहे.
‘पोलीस दलातील गैरप्रकार व बदल्यांच्या रॅकेटबद्दल तक्रार करणारे परमबीर सिंग हे पहिले अधिकारी नाहीत. त्याआधीच्या पोलीस महासंचालकांनीही पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटच्या संदर्भात एक अहवाल राज्य सरकारला दिला होता. माझ्याकडं त्यावेळच्या गुप्त अहवालाची प्रत आहे. याशिवाय, ६.३ जीबीचा डेटा आहे. त्यात सर्व प्रकारच्या संभाषणाचा पुरावा आहे,’ असं फडणवीस म्हणाले आहेत.
युवक कॉंग्रेसचे नेते सत्यजित तांबे यांनी देवेंद्र फडणवीसांच्या या पेनड्राईव्हभर पुरावाच्या दाव्याची खिल्ली उडवली आहे. ‘पुर्वी बैलगाडी भरुन पुरावे होते आता पेन ड्राईव्ह भरुन… पुराव्यांची साईज कमी होत चाललीय, अध्यक्ष महोदय’ ! अस ट्विट करत सत्यजित तांबे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
पूर्वी बैलगाडी भरुन पुरावे होते आता पेन ड्राईव्ह भरुन…
पुराव्यांची साईज कमी होत चाललीय, अध्यक्ष महोदय !
— Satyajeet Tambe (@satyajeettambe) March 23, 2021
महत्वाच्या बातम्या
- पिकविमा अध्यादेशाची शेतकऱ्यांकडून होळी
- फालतू गोष्टींवर बोलताना शांत होऊन बोलण्याचा प्रयत्न कर ; मांजरेकरांनी विराटला दिला खास सल्ला
- ‘संज्या राऊत सारखा पलटी मास्टर दुसरा नाही,काहीतरी नितीमत्ता असली पाहिजे माणसात’
- वीज पुरवठा खंडीत करणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यास मारहाण
- टॉस जिंकून इंग्लंडचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

