पुणे : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात थोड्याच वेळात पहिल्या एकदिवसीय सामन्याला सुरुवात होणार आहे. ही पहिली वनडे मॅच पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.
दरम्यान, इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तसेच टीम इंडिया प्रथम बॅटिंग करणार आहे. यावर विराटने प्रथम बॅटिंग मिळाल्यामुळे आनंद व्यक्त केला आहे. थोड्याच वेळात एकदिवशीय सामन्याला सुरुवात होणार आहे.
भारतीय संघ : रोहित शर्मा, शखर धवन, विराट कोहली, के. एल. राहुल, शेयश अय्यर, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, शार्दूल ठाकूर, भुनेश्वर कुमार, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा
सामने कधी व कोठे?
- पहिला सामना – २३ मार्च, दुपारी १.३० वाजल्यापासून
- दुसरा सामना – २६ मार्च, दुपारी १.३० वाजल्यापासून
- तिसरा सामना – २८ मार्च, दुपारी १.३० वाजल्यापासून
- थेट प्रक्षेपण – स्टार स्पोर्ट्स व हॉटस्टार
- स्थळ – सर्व सामने पुण्यात होतील.महत्वाच्या बातम्या
- यू ट्यूब घेत आहे नवीन फिचरची चाचणी; कॉपी कंटेंटला बसणार चाप
- पोलीस दलात बदल्यांचे मोठे रॅकेट, पुरावे घेऊन फडणवीस दिल्लीला रवाना
- परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात केलेली याचिका खोटी आहे का ?
- भाजपा महाराष्ट्रासाठी एक न्याय आणि गुजरातसाठी दुसरा न्याय का लावत आहे ?
- ‘भारतमातेच्या सुपुत्रांच हे बलिदान देशाच्या प्रत्येक पिढीसाठी प्रेरणास्रोत बनून राहील’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

