नवी दिल्ली: प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. आता सरकारनेही इलेक्ट्रिक कारच्या विक्रीला चालना देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे लोक इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याचा अधिक विचार करत आहेत. इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराने हवेचे प्रदूषण टळणार आहे. भारत कच्चे तेल आणि नैसर्गिक वायुच्या गरजेसाठी ८० टक्के आयात करतो. त्यासाठी लागणाऱ्या विदेशी चलनाचे प्रमाण हे इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराने कमी होऊ शकते.
या पार्श्वभूमीवर टेस्ला या प्रसिद्ध इलेक्ट्रिक वाहन कंपनीने टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी ट्विटरवरुन कंपनीच्या भारतातील योजनांबाबत माहिती दिली होती. तर केंद्रीय वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी देखील इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराचे वेळोवेळी महत्त्व सांगितले आहे.
त्यानंतर आता मस्क यांनी हेरगिरी संदर्भात आपली भूमिका व्यक्त केली आहे. यामध्ये त्यांनी चीन किंवा कुठ्ल्याही देशात आमच्या टेस्ला कार्सचा वापर हेरगिरीसाठी केला जाणार असेल तर टेस्ला कंपनी बंद करेन असे वक्तव्य टेस्ला आणि स्पेस एक्सचे सीईओ एलोन मस्क यांनी केले आहे.
गेल्या आठवड्यात वॉल स्ट्रीटच्या एका रिपोर्ट मध्ये चीन मध्ये सेना, राज्यातील महत्वाच्या व्यक्ती आणि सरकारी अधिकाऱ्यांनी टेस्ला कार्सचा वापर करण्यावर बंदी घालण्यात आल्याचे म्हटले होते. या कार्स मधील कॅमेरे, रेकॉर्ड मोड आणि अन्य सेन्सर्स तंत्रज्ञानाचा वापर गुप्त आणि संवेदनशील माहिती एकत्र करून अमेरिकेला पाठविली जाण्याची भीती चीन सरकारला वाटत आहे आणि त्यामुळे सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेऊन असे आदेश दिले गेल्याचे सांगितले जात आहे.
या संदर्भात चायना डेव्हलपमेंट फोरमबरोबर व्हर्च्युअली बोलताना मस्क म्हणाले हेरगिरी सारख्या कामात टेस्ला कधीच सामील होणार नाही. देश कोणताही असला तरी त्यांची संवेदनशील माहिती गुप्त राहिली पाहिजे याला आमचे नेहमीच प्रोत्साहन आहे. त्यामुळे चीनच काय पण अन्य कोणत्याही देशात टेस्ला कार्सचा वापर हेरगिरी करण्यासाठी, संवेदनशील माहिती मिळविण्यासाठी केला जात असेल तर टेस्ला कंपनी बंद करावी लागेल.
महत्वाच्या बातम्या
- यू ट्यूब घेत आहे नवीन फिचरची चाचणी; कॉपी कंटेंटला बसणार चाप
- शरद पवारांनी हा विषय राष्ट्रीय केला, फडणविसांचा टोला
- परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात केलेली याचिका खोटी आहे का ?
- भाजपा महाराष्ट्रासाठी एक न्याय आणि गुजरातसाठी दुसरा न्याय का लावत आहे ?
- ‘भारतमातेच्या सुपुत्रांच हे बलिदान देशाच्या प्रत्येक पिढीसाठी प्रेरणास्रोत बनून राहील’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

