Share

मद्यपान करण्यासाठी वयोमर्यादा ; मद्यपान विक्रीवर नवीन नियमावली

Published On: 

नवी दिल्ली : देशात बऱ्याच ठिकाणी अवैध दारू धंदे उभारले आहेत. अनेकदा स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने देखील असे अवैध दारू धंदे चालवले जातात. त्यामुळे देशातील तरुण वर्ग अगदी कमी वयातचं दारू पिण्याकडे आकर्षिला जात आहे. त्यामुळे आता दिल्ली सरकारने मोठी पावलं उचलली आहेत.

या नवीन नियमांमुळे आता उत्पादन शुल्क महसूलातही 20 टक्के वाढ होणार आहे. त्याचबरोबर अल्पवयीन तरुण तरुणीच्या मद्यपानविरुद्ध केजरीवाल सरकारनं नवीन मोहीम राबवायला सुरुवात केली जाणार आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशप्रमाणे आता दिल्लीतही दारु पिण्याचं कायदेशीर वय 21 वर्षे करण्यात आलं आहे. त्याचबरोबर ज्यांचं वय 21 वर्षांपेक्षा कमी असेल, अशांना ओळखपत्र दाखवणं अनिवार्य असेल. त्यामुळे कमी वयात दारुच्या व्यसनाकडे वळणाऱ्या तरुणांना काही प्रमाणात का होईना पण आवर घालता येणार आहे.

याव्यतिरिक्त केजरीवाल सरकार दिल्लीतील बनावट दारू धंद्यांना चाप बसवण्यासाठी भारतातील पहिलं आंतरराष्ट्रीय स्तरीय चेकिंग लेन तयार करणार आहे. याबाबतची माहिती उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!