Share

‘१०० कोटींच्या टारगेटसाठी तुम्ही देवांना कोंडून ठेवलं, या सरकारचा लवकरच नायनाट होईल’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुकेश अंबानी यांच्या घरासमोरील स्फोटक प्रकरणात सुरु असलेल्या चौकशीत प्रत्येक दिवशी नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. मुंबईमध्ये गाडीत स्फोटक सापडल्या प्रकरणी मुंबई पोलीस दलाचे निलंबित अधिकारी सचिन वाझे यांना राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणा अर्थात एनआयएने (NIA) अटक केली आहे. सचिन वाझेंना २५ मार्च पर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली असून या प्रकरणामुळे राजकीय क्षेत्रात देखील मोठी खळबळ उडाल्याचे दिसून आलं आहे.

माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हा दावा केला आहे. या पत्रात परमबीर सिंग म्हणतात, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं. महिन्याला इतकी मोठी रक्कम बार, रेस्टॉरंट आणि अन्य संस्थांकडून वसुली करायची होती. असा धक्काद्दायक खुलासा माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेला आहे.

यावरून आता राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. विरोधकांनी सरकारला अक्षरशः धारेवर धरलं आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. भाजपाचे आध्यात्मिक समन्वय आघाडी प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी देखील याप्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

ट्वीटरच्या माध्यमातून त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. यामध्ये ते म्हणाले कि, ‘मंदिरे बंद ठेऊन या ठाकरे सरकारला पब आणि बार सुरु करण्याची घाई का झाली होती हे आता सगळ्या महाराष्ट्राला कळतं आहे.१०० कोटींच्या टारगेटसाठी तुम्ही देवांना कोंडून ठेवलं, हे पाप फेडावं लागेल.आज गृहमंत्र्यांना घरी जावं लागेल पण हे सरकारही लवकरच जाणार.’

‘या सरकारचा सुद्धा लवकरच नायनाट होईल. अरे हि महाविकास आघाडी नाही, हि तर महावसुली आघाडी निघाली आहे.’ तसेच #MahaVasuliAghadi या हॅशटॅग चा सुद्धा वापर केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!