Share

आयपीएलआधी खेळाडूंना कोरोना लस द्या ; ‘या’ संघाची बीसीसीआयकडे मागणी

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयपीएल २०२१ च्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. कोरोना प्रादुर्भावानंतर आयपीएलचे भारतात पुनरागमन होत आहे. ९ एप्रिलला पहिला सामना तर अंतिम सामना हा ३० मे रोजी होणार आहे. मात्र, यंदाही स्पर्धा विनाप्रेक्षकच पार पडणार आहे. परंतु अखेरच्या टप्प्यात करोनाचा संसर्ग कमी झाल्यास निर्णय घेण्यात येईल, असा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.

कोरोना व्हायरसमुळे यावर्षीची आयपीएल फक्त 6 ठिकाणी खेळवण्यात येणार आहे. कोरोनाच्या संकटात प्रवासावर निर्बंध आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या सगळ्यामध्ये आता दिल्ली कॅपिटल्सच्या टीमने बीसीसीआय आणि सरकारकडे विशेष मागणी केली आहे. खेळाडूंना कोरोनाची लस देण्यात यावी अशी मागणी दिल्ली कॅपिटल्सने बीसीसीआय आणि सरकारला केली आहे. 9 एप्रिलपासून आयपीएलला सुरूवात होणार आहे, तर 30 मे रोजी आयपीएलची फायनल होणार आहे. बायो-बबलमध्ये संपूर्ण आयपीएल खेळवली जाणार आहे.

दिल्ली कॅपिटल्सचे सीईओ विनोद बिष्ट म्हणाले, ‘लस आमच्या डोक्यात आहे. खेळाडूंना एका शहरातून दुसऱ्या शहरात जावं लागेल, त्यामुळे आम्ही बीसीसीआयकडे ही मागणी केली आहे. बोर्ड याबाबत सरकारला विनंती करू शकते, पण याबाबत मला काहीही माहिती नाही. सरकार याला प्राथमिकता देईल, अशी आमची अपेक्षा आहे. ऑलिम्पिक खेळाडूंना आधीच यामध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे, त्यामुळे सरकार आम्हालाही मदत करेल.’

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!