Share

प्रशासकीय मान्यतेचे तीनतेरा करणाऱ्या सरपंच ग्रामसेवकाची चौकशी करण्याची मागणी

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : फुलंब्री तालुक्यातील नरला भावडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचाच्या संगनमताने ग्रामसेवक व शाखा अभियंता यांनी दलित वस्ती सुधार योजनेंर्तगत पाणी पुरवठा योजना प्रशासकीय मान्यता असतांना लाखों रूपये खर्चाचे काम ई टेंडरिग न करता मनमानी पध्दतीने करत बील उचलु पहात असल्याने सदर बील तात्काळ थांबवा व कामाची सखोल चौकशी करून कार्यवाही करा अशी मागणी ग्रा पं सदस्यांनी केली आहे .

फुलंब्री तालुक्यातील नरला – भावडी ग्रुप ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक व शाखा अभियंता यांनी बोगस काम दाखवत प्रशासकीय मान्येतेचे तीन तेरा करत बील उचलुन आपले उखळ पांढरे करण्याचा प्रयत्न सुरू असून मार्च एडीगचे कारण पुढे करत सन २०१८- १९ च्या प्रशासकीय मान्यतेनुसार काम न करता किंवा सुधारीत प्रशासकीय मान्यता न घेता मनमानी पध्दतीने दलित वस्ती स्थळ बदलत नरला वाडी परिसरातील शाळेच्या इमारत परिसरात ६ फुटाचे बेसमेंट व ८-१० फुट उंचीची पाणी साठवण टाकी निकृष्ट दर्जाची बनवत, अंदाजे १००० फुट लांबीची पाईप लाईन साठी ५ लाखापर्यंत खर्च दाखवला आहे.

शाखा अभियंता डोंगरे यांनी सर्व शासकीय नियम धाब्यावर बसत पाणी पुरवठा पाईप लाईन असी प्रशासकीय मान्यता असतांना एमबीवर टाकी सह पाईप लाईन दाखली. १८ जुलै २०१९ चा क्र १४० ची प्रशासकीय मान्यता व १६ सप्टेंबर २०१९ रोजीचा कार्यारंभ आदेश फक्त पाईप लाईन चे आहे. असे असतांना ग्रामसेवक नरवडे यांनी सुधारित प्रशासकीय मान्यता न घेता बोगस कामे उरकुन लाखोचे बील बनवले. विशेष बाब म्हणजे कार्यारंभ आदेश पत्र कॉलम क्र ४ मध्ये नमुद टिपमध्ये उल्लेखीत १ लाखापेक्षा जास्त रक्कमेच्या कामासाठी ई टेंडरिंग करणे शासन नियमात असतांना तसे करण्यात आले नाही.  शासकीय जि प अखत्यारित असलेल्या कामाच्या ठिकाणी माहिती फलक बसवणे यावर कंत्रांटदाराचे नाव, कार्यारंभ आदेश, कामाचा खर्च, काम पूर्ण करावयाचा दिनांक, दोष निवारण कालावधी याचा उल्लेख येथे करण्यात आलेला नाही.

सदर काम अपूर्णावस्थेत असून टेस्ट रिपोर्ट सादर न करता मार्च ऐंडींगचे कारण पुढे करून लाखो रुपयाचे बील उचलंण्याचे प्रयत्न सरपंच, ग्रामसेवक, शाखा अभियंता यांच्यासह कार्यालयीन कर्मचारी यांच्या संगनमताने होत असल्याचे लक्षात येताच सदरचे बोगस काम प्रशासनाच्या निदर्शनास आणुन देत. सदर बील आपण त्वरित थांबवा अशी मागणी ग्राम पं सदस्य संपत आजिनाथ तुपे व भाऊसाहेब बाबुराव बनकर यांनी २६ मे रोजी गट विकास आधिकारी फुलंब्री यांना दिलेल्या निवेदनात केली आहे .

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!