🕒 1 min read
पुणे : मागील वर्षीच्या आयपीएल सत्रात सूर्यकुमार यादव याने उल्लेखनीय कामगिरी केली होती. मात्र, यानंतरच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याचा समावेश केला गेला नव्हता. यामुळे क्रिकेट रसिकांनी मोठा रोष व्यक्त केला होता. यानंतर, भारत विरुद्ध इंग्लंडच्या टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात सूर्यकुमार यादवला भारताकडून आंतरराष्ट्रीय क्षेत्रात पदार्पण देण्यात आली होती. मात्र, या सामन्यात त्याला फलंदाजी करण्याचा मौकाच भेटला नव्हता.
तर, चौथ्या टी-२० सामन्यात त्याला पुन्हा एकदा संघात स्थान मिळाले आणि त्याने संधीचं सोनं केलं. पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत त्याने आपल्या कारकिर्दीला अविस्मरणीय सुरुवात केली. इतकचं नाही तर, भारतीय संघाला गरज असताना त्याने झुंजार अर्धशतकी खेळी करून भारताला चांगल्या स्थितीत नेलं. ३१ चेंडूत त्याने ५६ धावा केल्या होत्या.
दरम्यान, इंग्लंड आणि भारतीय संघामध्ये होणाऱ्या एकदिवसीय सामन्यांसाठीच्या संघाची घोषणा शुक्रवारी करण्यात आली आहे. एकदिवसीय मालिकेचे सर्व सामने पुण्यातील MCA(गहुंजे) स्टेडियममध्ये खेळवले जाणार आहेत. यामध्ये दोन नव्या खेळाडूंना स्थान देण्यात आलं आहे. सूर्यकुमारची देखील निवड करण्यात आली असून या मालिकेदरम्यान तो एकदिवसीय क्रिकेट प्रकारात पदार्पण करत आहे. यामुळे, त्याला त्याच्या कष्टाचे फळ या वर्षी मिळत असल्याचं समोर आलं आहे.
तर, आयपीएलमध्ये केकेआर संघाकडून चमकदार कामगिरी करणारा गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला भारतीय संघात स्थान देण्यात आलेले आहे. तसेच, कृणाल पांड्याचा देखील एकदिवसीय सामन्यासाठी समावेश करण्यात आला असून तो देखील एकदिवसीय क्रिकेट प्रकारात भारतीय संघासाठी पदार्पण करत आहे.
असा आहे भारतीय संघ –
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल (यष्टीरक्षक), यजुर्वेंद्र चहल, कुलदीप यादव, क्रुणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, टी. नटराजन, भुवनेश्वर कुमार, मो. सिराज, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर.
महत्त्वाच्या बातम्या
- संतापजनक : पुण्यात शालेय पोषण आहार म्हणून दिलं पशुखाद्य !
- ‘व्यवहार माझे, जबाबदार वाझे!’ अमृता फडणवीस यांची बोचरी टीका
- ‘मला शिवसेना कळली, त्यामुळे खैरेंची गरज नाही, अंबादास दानवेंचा पलटवार
- कोरोना वाढतोय : आज पुण्यात तब्बल ‘इतक्या’ रुग्णांची नोंद
- ‘वाझे प्रकरणाच्या गदारोळात संजय राठोडचे पाप झाकले जाणार नाही याची काळजी घेऊ’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

