Share

राजू शेट्टींचा वीज बिलाप्रश्नी निर्णय घेण्यासाठी सरकारला आठ दिवसाचा अल्टिमेटम

Published On: 

🕒 1 min read

कोल्हापूर : वाढीव वीज बिल आणि सक्तीच्या वीज बिल वसुलीविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात राज्यातील विविध जिल्ह्यात आंदोलन करण्यात आले. राज्यभरात सर्वपक्षीय आंदोलनाला कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक, बुलडाणा आणि वाशिममध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात पुणे बेंगलोर महामार्ग तब्बल दीड तास रोखून धरण्यात आला होता. अखेर पोलिसांनी राजू शेट्टी यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेत वाहतूक सुरळीत केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले आहे.

लॉकडाऊन काळातील वीजबिल माफीच्या मागणीसाठी कोल्हापुरातील सर्वपक्षीय संघटनाकडून आंदोलन करण्यात आलं होत. राजू शेट्टींनी यावेळी वीज बिलप्रश्नी निर्णय घेण्यासाठी सरकारला आठ दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे.

कृषी पंपाचे वीज कनेक्शन तोडणी व सक्तीची थकीत वीजबिल वसुली विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने नाशिक-औरंगाबाद राज्य मार्गावरील निफाड तालुक्यातील चांदोरी चौफुलीवर रास्तारोको आंदोलन करत निषेध व्यक्त केला.

उन्हाच्या तडाख्यात दररोज वाढ होत असल्याने विहिरीनी तळ गाठण्यास सुरुवात केली शेती पिकांना पाण्याची गरज असताना अशातच महावितरणने वीजबिल थकल्याने कृषी पंपाचे वीज कनेक्शन तोडण्यास सुरुवात केली केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने महावितरणच्या विरोधात राज्यात ठिकठिकाणी रास्तारोको करण्याचा इशारा दिला होता.

मात्र, इशाऱ्यानंतर ही वीज कनेक्शन तोडणी सुरू असल्याने आज नाशिकच्या निफाड तालुक्यातील चांदोरी चौफुलीवर घोषणाबाजी करत रस्तारोको आंदोलन करत नाशिक-औरंगाबाद राज्य मार्ग काही काळ अडवण्यात आला. यावेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवासाचा खोळंबा झाला होता. हे आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नाशिकचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र शिरसाट यांच्या नेतृत्वात करण्यात आले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!