Share

सुरू होता बालविवाह, पोलीस येताच वऱ्हाडींनी ठोकली धुम!

Published On: 

बीड: माजलगाव तालुक्यातील हिवरा या गावातल्या एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावण्यात येणार होता. पण सामाजिक कार्यकर्त्या यांनी वेळीच हा बालविवाह थांबवला. धारुर तालुक्यातील कारी या गावातल्या एका मुलासोबत गुरुवार (दि. १८) रोजी त्या अल्पवयीन मुलीचा विवाह लावला जाणार होता. माजलगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या व दिंद्रुड पोलिस तिथे आल्याचे पाहताच वऱ्हाडी मंडळी पळून गेल्याने हा बालविवाह थांबवण्यात यश आले.

हिवरा गावातील १६ वर्षीय मुलीचा विवाह कारी येथील मुला सोबत गुरुवारी आयोजित करण्यात आला होता. लग्नासाठी लागणारी सर्व तयारी सुरु होती. हळदीचा मांडव तसेच विवाहासाठी लागणारे सर्व साहित्य व तयारी पुर्ण करण्यासाठी दोन्ही परिवरातील मंडळी कामाला लागले होते. मात्र माजलगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल व दिंद्रुड पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी निलेश विदाटे विवाह स्थळावर पोहोचले.

पोलिसांना तिथे पाहताच तिथे वऱ्हाड्यांची चांगलीच धांदल उडाली आणि तेथून लगेच काहींनी पळ काढला. तिथे पोलिसांनी विचारपूस केली तेव्हा, हा विवाह समारंभ नसून साखरपुडा कार्यक्रम असल्याचा बनाव मुलीच्या घरच्यांनी केला. मात्र सामाजिक कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे सर्व प्रकार उघडकीस आला आणि वऱ्हाडी मंडळीने काढता पाय घेत विवाहसोहळा रद्द केला.

नियमानुसार लग्नासाठी मुलीचे वय १८ तर मुलाचे वय २१ पूर्ण असणे गरजेचे आहे. शासन तसेच संस्थांकडून याची जनजागृती होत असते पण तरीही ग्रामीण भागात अजूनही बालविवाह लावण्यात येत आहेत. आरोग्य मंत्रालयाने केलेल्या कुटुंब सर्वेक्षणात बीड जिल्हा राज्यात दुसऱ्या स्थानावर असल्याचे समोर आले आहे. हे बालविवाह थांबवण्यासाठी अजून जनजागृती करण्याची गरज आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!