🕒 1 min read
न्यूयॉर्क : संपूर्ण जगाला कोरोना महामारीचा फटका बसला आहे. बरेच नुकसान या काळात झाले आहे. असे असताना एक सकारात्मक बाब समोर आली आहे. अमेरिकेतील बालरोगतज्ञांनी एक मोठा दावा केला आहे. अमेरिकेत जन्म झालेल्या नवजात बालकाच्या शरीरात कोरोना व्हायरसच्या अँटिबॉडिज आढळल्या आहेत. बाळाचा जन्म कोरोनाच्या अँटिबॉडिजसह होणे, असे पहिल्यांदाच घडले आहे. गरोदरपणात कोरोनाच्या लसीचा पहिला डोस या नवजात बाळाच्या आईला देण्यात आला होता.
यासंदर्भात आरोग्य विज्ञान संबंधित ईप्रिंट प्रकाशित करणाऱ्या ‘मेडआर्काइव’ वर प्रकाशित करण्यात आलेल्या रिसर्चनुसार, या महिलेला गरोदरपणात ३६व्या आठवड्यात डोस देण्यात आला होता. लसीचा डोस घेतल्यानंतर तीन आठवड्यांनी महिलेने एका निरोगी बाळाला जन्म दिला. बाळाच्या जन्मानंतर त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. ज्यामध्ये बाळाच्या रक्तात अँटिबॉडिज आढळून आल्याचा खुलासा करण्यात आला. मात्र या संशोधनाचे पुनरावलोकन अद्याप करण्यात आलेले नाही.
अमेरिकेतील फ्लोरिडाच्या अटलांटिक विश्वविद्यालयाचे सह लेखक पॉल गिल्बर्ट आणि चाड रूडनिक यांनी सांगितले की, एखाद्या नवजात बाळाच्या शरीरात कोरोनाच्या अँटिबॉडिज आढळण्याची ही पहिलीच घटना असल्याचे समोर येत आहे. तसेच बाळाच्या आईला लसीचा दुसरा डोस देखील २८ दिवसांनी देण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री रावत यांच्या वक्तव्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा देखील देशातील सर्व न्यायाधीशांना सल्ला
- दहावी-बारावीच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार होणार विद्यार्थ्यांनी तयारी करावी…
- ‘अरे देवा, यांचे गुडघे दिसत आहेत की’; प्रियांका गांधींची तीरथ सिंह रावतवर टीका
- वीरेंद्र सेहवागचे असेही एक टि्वट; पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा वापरला फोटो
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
