Share

मुंबई पोलीस दलात कोणत्याही विभागात विशेष पथक नसेल, पोलीस आयुक्त हेमंत नगराळेंचा पहिला निर्णय

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : पोलीस आयुक्त हेमंत नगराळेंचा यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिला निर्णय घेतला आहे. ‘मुंबई पोलीस दलातील विशेष पथकाची लवकरच पुनर्रचना होणार आहे. यापुढे मुंबई पोलीस दलात कोणत्याही विभागात विशेष पथक नसेल.’ मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी हा निर्णय घेतला आहे. दोनच दिवसांपूर्वी परमबीर सिंह यांची उचलबांगडी करुन हेमंत नगराळे यांच्याकडे पोलीस आयुक्तपदाचा चार्ज देण्यात आला आहे. कायदा आणि सुव्यवस्था, क्राईम, आर्थिक गुन्हे शाखा, प्रशासन आणि ट्राफिक मुंबई पोलीस दलात असे पाच विभाग आहेत.

यापैकी कायदा आणि सुव्यवस्था, क्राईम आणि आर्थिक गुन्हे शाखा या तीन विभागात तपासाच्या अनुषंगाने वेगवेगळी पथक, सेल निर्माण केली जात असतात. मात्र आता असा प्रकार होणार नाहीत. कोणतेही विशेष पथक सुरु न ठेवण्याचा किंवा न बनवण्याचा निर्णय मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी घेतला आहे. क्राईम ब्रांचमध्ये अशी अनेक पथकं आहेत. ती सुरु ठेवायची की नाही, याचा लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. सचिन वाझे सीआययूचे प्रमुख होते. त्यांनी जो प्रकार केला आहे, त्याने पोलीस दल बदनाम झालं आहे. या पार्श्वभूमीवर नव्या आयुक्तांनी बदल करायचा निर्णय घेतला आहे.

सर्वांना माहिती आहे, मुंबई पोलीस सध्या एका कठीण समस्येतून जात आहेत. ही समस्या पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या मदतीने सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने माझी नेमणूक केलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदेशाप्रमाणे मी हा कार्यभार स्वीकारला आहे. मुंबई पोलिसांची जी प्रतिमा मलिन झाली आहे, त्याला येणाऱ्या दिवसात चांगलं करण्याचा प्रयत्न करणार. आमच्या मुंबई शहरामधील अधिकारी कर्मचारी सगळ्यांचं सहकार्य, सहभाग या कार्यामध्ये लाभणार असल्याचंही हेमंत नगराळे यांनी काल आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारताना सांगितलं होत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!