🕒 1 min read
मुंबई: सध्या भारतीय सिनेसृष्टीत सध्या बायोपिकपटांचे वारे वाहात आहेत. यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गजांवर चित्रपट बनवले जात आहेत. यामध्ये क्रीडा विश्वातील धोनी, मिल्खासिंग, तसेच येत्या काळात ‘पृथ्वीराज’, ‘मैदान’, ’83’, ‘सरदार उधम सिंग’ असे अनेक चरित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. या यादीत आता आणखी एका नव्या चित्रपटाची भर पडली आहे. हा चित्रपट प्रसिद्ध बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या आयुष्यावर आधारित आहे. तर राजकारणातील नेत्यांवर देखील अनेक सिनेमे आले आहेत यामध्ये आता तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावर आधारीतबॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत एक नवा चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या आगामी चित्रपटाचं नाव ‘थलायवी’ असं आहे.
यावर्षी 23 मार्च रोजी तिच्या आयुष्यातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या चित्रपटाचा अर्थात ‘थलायावी’चा ट्रेलर लाँच होणार आहे. हा दिवस खास आहे. कारण 23 मार्च हा कंगना रनौतचा वाढदिवस आहे. त्यामुळे वाढदिवस सर्वात अविस्मरणीय ठरणार आहे. कंगनाचा हा खास दिवस संस्मरणीय करण्यासाठी ‘थलायवी’ची टीम कसलीही कसर सोडणार नाहीय. चित्रपटाच्या प्रमोशनची प्रत्येक शैली स्वत:मध्येच खास असणार आहे. याची सुरुवात खास बॉलिवूड क्वीन कंगना रनौतच्या वाढदिवसापासून होणार आहे त्यांनतर हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे ठरले असून 23 एप्रिलला रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
हा चित्रपट येत्या एप्रिलमध्ये जयललिता यांच्या जयंतीदिनी म्हणजेच 23 एप्रिलला देशभरात प्रदर्शित होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा चित्रपट एकाच वेळी वेगवेगळ्या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हिंदी, तेलुगु आणि तमिळ या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री रावत यांच्या वक्तव्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा देखील देशातील सर्व न्यायाधीशांना सल्ला
- दहावी-बारावीच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार होणार विद्यार्थ्यांनी तयारी करावी…
- ‘अरे देवा, यांचे गुडघे दिसत आहेत की’; प्रियांका गांधींची तीरथ सिंह रावतवर टीका
- वीरेंद्र सेहवागचे असेही एक टि्वट; पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा वापरला फोटो
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
