🕒 1 min read
नवी दिल्ली: उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी महिलांबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. रिप्ड जीन्स संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्या विरोधात अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. त्यांचे हे वक्तव्य कोणालाही न पटणारे आहे. त्यांच्या या विधानानंतर देशभरातून महिलांनी संताप व्यक्त केला. जया बच्चन आणि त्यांची नात नव्या नवेलीनेही या विधानावर आपले रोकठोक मत व्यक्त केले होते. त्यानंतर आता काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी देखील रावत यांच्या वक्तव्यवर जोरदार टीका केली आहे.
प्रियांका गांधींनी आपल्या फेसबुक आणि ट्विटर अकाऊंटवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे आरएसएसच्या जुन्या पोशाखातील खाकी हाफ चड्डी परिधान केलेले फोटो शेअर करत ‘अरे देवा, यांचे गुडघे दिसत आहेत की.’, असे यात त्यांनी म्हंटले आहे.
Oh my God!!! Their knees are showing ???????????? #RippedJeansTwitter pic.twitter.com/wWqDuccZkq
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) March 18, 2021
बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत बोलत असताना, महिला वापरत असलेल्या जीन्सबाबात त्यांनी आक्षेप घेतला आहे. ‘आजकाल महिला फाटलेल्या जीन्स घालून फिरतात, हे सगळं बरोबर आहे का? हे कसले संस्कार आहेत’असं तीरथ सिंह रावत यांनी म्हटलं आहे. या विधानावरून अनेक भागातून रावत यांच्यावर संताप व्यक्त केला जाता आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘परमबीर सिंग यांना बदलले म्हणजे ते गुन्हेगार ठरतात असे नाही’
- निर्णायक लढतीत भारताचा विजय; मालिकेतील आव्हान कायम
- औरंगाबाद मध्ये कोरोनाचा विस्फोट; गुरुवारी आढळले १५५७ कोरोनाबाधीत
- मराठी आभिनेता उमेश कामत आणि प्रिया बापटला यांना कोरोनाची लागण
- एमबीए आणि तेही क्रिकेटमध्ये? ऑस्ट्रेलीया क्रिकेटने सादर केली संकल्पना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
