Share

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे सद्याची स्थितीत योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र सरकार कडून योग्य अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे. यादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. आज सकाळी साडेदहा वाजता मुख्यमंत्री नंदुरबार मधील सातपुडा डोंगर रांगांमध्ये असलेल्या मोलगी आणि धडगावच्या आरोग्य केंद्रांची पाहणी करून स्थानिक नागरिकांशी संवाद साधणार आहेत. तसेच यावेळी कोरोना लसीकरण संदर्भातली माहिती ते घेणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आजचा दिनक्रम-

  • सुरवानी येथे सुरू असलेल्या वीज वितरण उपकेंद्राच्या कामाची पाहाणी.
  • धडगावमधल्या रुग्णालयांमध्ये कोरोना लसीकरणसंदर्भातली माहिती घेणार.
  • वनविभागाच्या रोपवाटिकेला भेट दिल्यानंतर मुंबईकडे रवाना होणार आहेत.

मुख्यमंत्री याठिकाणी हेलिकॉप्टरने येणार आहेत. परंतु , नंदुरबार जिल्ह्यामध्ये पहाटे पाऊस पडल्यामुळे ढगाळ वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे. याचा काही परिणाम मुख्यमंत्रीच्या दौऱ्यावर होण्याची शंका व्यक्त केली जात आहे. मात्र तरी देखील हा दौरा नियोजित वेळेप्रमाणे होणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!