🕒 1 min read
अहमदाबाद : आपल्या पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक झळकावल्यानंतर इशान किशनने सर्वांचे लक्ष स्वत: कडे वेधुन घेतले. मात्र पुढच्याच सामन्यात इशान किशन हा अवघ्या ४ धावांवर बाद होऊन तंबुत परतला. या सामन्यात इशान किशनच्या फलंदाजी क्रमवारीत बदल केल्यामुळे भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी जोरदार टिका केली आहे.
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात इशान किशनने अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. या सामन्यात इशान किशनने सलामीला खेळत शानदार फलंदाजी करत अर्धशतक झळकावत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. मात्र पुढच्या सामन्यात इशान किशनला सलामीला न पाठवता तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले होते. यावर भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी टि्वट करत टिका केली आहे.
After a sensational debut as a T20 opener that Ishan is not opening in the next game is just beyond me! #INDvENG
— Sanjay Manjrekar (@sanjaymanjrekar) March 16, 2021
या टि्वट मध्ये मांजरेकर म्हणाले की, ‘पहिल्याच सामन्यात सलामीला शानदार खेळी करणाऱ्या इशान किशनला पुढच्याच सामन्यात त्याला सलामीला का पाठवण्यात आले नाही, हे माझ्या विचाराच्या पलीकडचे आहे. तिसऱ्या टी-२० सामन्यातही इशानलाच सलामीला पाठवायला हवे होते.’ असे मांजरेकर म्हणाले. याआधी तिसऱ्या टी-२० सामन्यात एकही चेंडू न खेळणाऱ्या सूर्यकुमार यादवला संघाबाहेर केल्यामुळे भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने टिका केली होती.
महत्वाच्या बातम्या
- युवराजची बॅट पुन्हा तळपली; पुन्हा केली षटकांराची बरसात
- रोमहर्षक सामन्यात विजय मिळवत भारताचा रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजच्या अंतिम सामन्यात प्रवेश
- भारत-इंग्लड चौथा टी-२० आज; मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी विजय आवश्यक
- सिल्लोड नगर परिषदेत समाज सेविकेसह अन्य लोकांचा राडा
- करुणा धनंजय मुंडे लढवणार आमदारकी,आज घेतली महापौरांच्या भेट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
