परभणी : कोरोनामुळे राज्याची आर्थिक बाजू कोलमडली असून, स्थानिक प्रशासन सुद्धा आर्थिक अडचणीत सापडले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. शहरात कराच्या थकबाकीचा डोंगर वाढत असल्याने महानगरपालिकेसमोर आर्थिक अडचणी उभ्या टाकल्या आहेत. कर वसुलीसाठी मनपा प्रशासन विविध मार्गाने प्रयत्न करीत आहे.
नागरिकांनी ३१ मार्चपर्यंत कर भरावा यासाठी मालमत्ता कर आणि पाणीपट्टीवरील विलंब आकारणी रक्कम १०० टक्के माफ करण्यात आली आहे. विलंब आकारणी रक्कम १०० टक्के माफ केल्यानंतर तरी नागरिक कर भरतील अशी अपेक्षा प्रशासन करत आहे. सद्य:स्थितीला एकूण करापैकी मालमत्ता कराची १६ कोटी ५ लाख रुपये आणि पाणीपट्टीची ३ कोटी ७० लाख रुपये वसुली झाली आहे. विशेष म्हणजे मालमत्ता करातील चालू थकबाकी २३ कोटी ५९ लाख रुपये आहे.
मागील अनेक वर्षांपासूनची थकबाकी त्यापेक्षा दुप्पट म्हणजे ५६ कोटी ८६ लाख रुपये एवढी आहे. ५० हजार रुपयांपेक्षा अधिक कराची थकबाकी असलेले १हजार ८२ नागरिक असून, त्यांच्याकडे ३९ कोटी रुपयांचा कर थकला आहे. तर ६ हजार ८४९ मालमत्ताधारक अनिवासी आहेत. त्यांच्याकडे ३७ कोटी ४७ लाख रुपयांचा कर थकीत आहे.
महत्वाच्या बातम्या
- संजय राऊतांच मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री करा : चंद्रकांत पाटील
- सचिन वाझे, परमबीर सिंग छोटी माणसं, त्यांच्या मागचे सूत्रधार शोधा : फडणवीस
- शिवसेनेच्या सक्रिय नेत्यांबरोबर सचिन वाझेचे व्यावयासिक संबंध
- राज्याची चिंता वाढली; तब्बल २० हजारांहून अधिक रुग्णांची आज नव्याने भर !
- मराठी भाषेत नामफलक न लिहिणाऱ्या धार्मिकस्थळांवर कारवाई
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
