🕒 1 min read
रायपुर : रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर रोमहर्षक विजय मिळवत अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला. आखेरच्या षटकांपर्यंत चाललेल्या या सामन्यात भारताने १२ धावांनी विजय मिळवला आहे. आखेरच्या षटकांत १७ धावांची गरज असताना वेस्ट इंडिजने फक्त ४ धावा करत एक गडी गमावला.
रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजच्या उपांत्य सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना सचिन तेंडुलकरच्या अर्धशतक आणि युवराजच्या फटकेबाजीच्या जोरावर ३ गडी गमावत २१८ धावसंख्या उभी केली. सचिन-सेहवाग या सलामी जोडीने भारताला चांगली सुरुवात करुन दिली. सेहवाग बाद झाल्यानंतर सचिनने मोहम्मद कैफ आणि युसूफ पठाणच्या साथीने धावफलक हलता ठेवला. सचिन बाद झाल्यानंतर आलेल्या युवराजने फटकेबाजी करत भारताची धावसंख्या २०० च्या पार नेली.
दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजने पहिला गडी स्वस्तात गमावला मात्र त्यानंतर सलामीवीर स्मिथने जोरदार फलंदाजी करत भारतीय संघाच्या गोलदांजीचे पाणी पळवले. स्मिथ बाद झाल्यानंतर ब्रायन लाराने फटकेबाजी करत सामना वेस्ट इंडिजला विजयाच्या दारात आणले होते. मात्र एकोणीसाव्या षटकांत लारा बाद झाल्यानंतर भारतीय गोलंदाजानी टिच्चुन गोलंदाजी करत वेस्ट इंडिजच्या संघाला २०६ या धावसंख्येवर रोखले. आखेरच्या षटकामध्ये वेस्ट इंडिजला विजयासाठी १७ धावांची गरज असताना इरफान पठाणने फक्त चार धावा देत एक बळी मिळवला आणि भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
महत्वाच्या बातम्या
- भारत-इंग्लड चौथा टी-२० आज; मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी विजय आवश्यक
- सिल्लोड नगर परिषदेत समाज सेविकेसह अन्य लोकांचा राडा
- करुणा धनंजय मुंडे लढवणार आमदारकी,आज घेतली महापौरांच्या भेट
- संजय राऊतांच मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री करा : चंद्रकांत पाटील
- मुंबई पोलिसांवर कोणतीही टीका होऊ देणार नाही, सर्वांनी साथ द्या- हेमंत नगराळे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
