🕒 1 min read
अहमदाबाद : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात पराभव पत्कारल्यानंतर आज होणाऱ्या चौथ्या सामन्यासाठी भारतीय संघ पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. टी-२० मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी भारताला आजच्या सामन्यात विजय मिळवणे आवश्यक आहे. मालिकेत सध्या २-१ च्या फरकाने इंग्लंडचा संघ आघाडीवर आहे.
आतापर्यंत मालिकेत भारताच्या संघाला डावाची भक्कम सुरुवात देण्यात सलामीवीर फलंदाज अपयशी ठरले आहेत. तिन्ही सामन्यात सलामीवीर लोकेश राहुल हा सपशेल अपयशी ठरला आहे. मात्र कर्णधार कोहलीने त्याच्यावर विश्वास दाखवत त्याला संघात कायम ठेवले आहे. तेव्हा आज होणाऱ्या सामन्यात राहुलच्या कामगीरीवर सर्वांचे लक्ष लागलेले आसेल.आतापर्यंतच्या तिन्ही सामन्यात प्रथम फलंदाजी करणारा संघ सपशेल अपयशी ठरला. भारतीय संघात कर्णधार विराट कोहली चागंल्या फॉर्ममध्ये आहे. मात्र बाकीचे फलंदाज त्याला साथ देत नसल्यामुळे संघाला मोठी धावसंख्या उभा करायला आडचणी येत आहे.
गोलंदाजीत चहलला संघाबाहेर बसवले जाण्याची शक्यता आहे. तर मागील सामन्यातील फलंदाजी क्रम तोच राहतो का त्यात बदल होतो ही महत्वाची बाब आहे. तर दुसरीकडे इंग्लंडचा संघाचे गोलंदाज चांगली कामगीरी करत आहे. रॉय आणि बटलर दोघेही फॉर्ममध्ये परतले आहेत ही भारतीय संघासाठी चिंतेची बाब ठरु शकते.
महत्वाच्या बातम्या
- सिल्लोड नगर परिषदेत समाज सेविकेसह अन्य लोकांचा राडा
- करुणा धनंजय मुंडे लढवणार आमदारकी,आज घेतली महापौरांच्या भेट
- संजय राऊतांच मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री करा : चंद्रकांत पाटील
- मुंबई पोलिसांवर कोणतीही टीका होऊ देणार नाही, सर्वांनी साथ द्या- हेमंत नगराळे
- औरंगाबाद उजळले! शहरात पहिले ‘स्मार्ट सिग्नल’ कार्यान्वित
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
