औरंगाबाद: सिल्लोड येथील नगरपरिषद येथे शासकीय कामात अळथळा निर्माण करून नप मधील अधिकारी कर्मचारी यांना शिवीगाळ करून, जीवे मारण्याची धमकी देने, खोटे ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्याची धमकी देणाऱ्या पुण्यातील एक समाज सेविका तसेच सिल्लोड येथील चार जण व इतर 25 ते 30 लोकांवर नपचे मुख्याधिकारी रफिक सैय्यद यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांच्या फिर्यादीवरून शासकीय कामात अळथळा निर्माण करणे, कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणे याअंतर्गत रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
शहर पोलीस ठाण्यात नपचे मुख्याधिकारी रफिक सैय्यद यांनी दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे की, नगरपरिषद येथे पुण्यातील एक समाज सेविका विशाखा गायकवाड, सिल्लोड येथील महेश शंकरलाल शंकरपेल्ली, गणेश शंकरलाल शंकरपेल्ली, शेख रफिक रहीम, कमलेश कटारिया व इतर 25 ते 30 लोक नेहमी येऊन शासकीय कामात अळथळा निर्माण करतात. नप मधील अधिकारी कर्मचारी यांना शिवीगाळ करूतात,जीवे मारण्याची धमकी देने, खोटे ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्याची धमकी देतात. तसेच सध्या कोरोनाच्या पार्शवभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन हे लोक करीत आहे.
यामुळे नप मधील अधिकारी व कर्मचारी यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने वरील लोकांवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कार्यवाही करावी असे म्हंटले आहे. दिलेल्या तक्रारीवरून रात्री उशिरापर्यंत वरील लोकांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
महत्वाच्या बातम्या
- ‘मी बारामतीतून लोकसभा लढविणार’, महादेव जानकरांचा इरादा पक्का
- सचिन वाझे, परमबीर सिंग छोटी माणसं, त्यांच्या मागचे सूत्रधार शोधा : फडणवीस
- शिवसेनेच्या सक्रिय नेत्यांबरोबर सचिन वाझेचे व्यावयासिक संबंध
- राज्याची चिंता वाढली; तब्बल २० हजारांहून अधिक रुग्णांची आज नव्याने भर !
- मराठी भाषेत नामफलक न लिहिणाऱ्या धार्मिकस्थळांवर कारवाई
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
