Share

मुंबई पोलिसांवर कोणतीही टीका होऊ देणार नाही, सर्वांनी साथ द्या- हेमंत नगराळे

Published On: 

मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर विविध मुद्द्यांवरून महाराष्ट्र पोलिसांवर खासकरून मुंबई पोलिसांवर विविध आरोप केले जात आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासापासून ते सचिन वाझे यांच्या पर्यंत मुंबई पोलिसांवर विविध टीका करण्यात आल्या. दरम्यान, महाविकास आघाडी सरकार पोलिसांवर दबाव ठेवत असल्यामुळे त्यांना योग्य कामकाज करता येत नसल्याची टीका भाजपने केली आहे.

तर, सचिन वाझेंच्या प्रकरणामुळे महाविकास आघाडी सरकारची अडचण वाढत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विविध नेत्यांसह पोलीस अधिकाऱ्यांच्या भेटीचा सपाटा लावला होता. अखेर, सचिन वाझेंच्या निलंबनानंतर आता परमबीर सिंग यांची मुंबई पोलीस आयुक्तपदावरून बदली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.

हेमंत नगराळे यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदेशाप्रमाणे मी हा कार्यभार स्वीकारला आहे असं त्यांनी सांगितलं आहे. तसेच, पत्रकार परिषद घेऊन त्यांनी विविध विषयांवर भाष्य करत आपल्या कामाचा ‘इरादा’ त्यांनी स्पष्ट केला आहे.

मुंबई शहरामधील अधिकारी कर्मचारी सगळ्यांचं सहकार्य, सहभाग मला मिळेल हा विश्वास आहे. आपण सर्वांनी या कार्यात सहकार्य करावं, जेणेकरुन महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांचं नाव चांगलं होईल. कोणतीही टीका मुंबई पोलिसांवर होणार नाही, अशी परिस्थिती सर्वांच्या सहकार्याने निर्माण करू. तसेच, चांगलं सक्षम पोलीस दल म्हणून काम करु, अशी मी ग्वाही देतो,’ असं भाष्य हेमंत नगराळे यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!