Share

‘शिवसेनेच्या सक्रिय नेत्यांबरोबर सचिन वाझेचे व्यावयासिक संबंध’

Published On: 

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मुकेश अंबानींच्या घराबाहेर गाडीमध्ये ठेवलेले स्फोटकाचं प्रकरण गाजत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर हल्लाबोल केलाय.

एपीआय सचिन वाझे यांना नोकरीवर परत का घेतलं गेलं. २००४ मध्ये ते निलंबित झाले. २००७ मध्ये त्यांनी व्हीआरएस घेतली. पण तरीही त्यांची व्हीआरएस स्वीकारली गेली नाही. कारण त्यांच्यावर चौकशी सुरू होती. २०१८ मध्ये मी मुख्यमंत्री होतो. त्यावेळी शिवसेनेकडून दबाव होता. एपीआय सचिन वाझे यांना पुन्हा एकदा सरकारी सेवेत घेण्यात यावे, यासाठी उद्धव ठाकरेंनी फोन केला, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी वाझे प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे करताना सरकारला धारेवर धरलं. तसेच सचिन वाझे आणि शिवसेनचे नजिकचे संबंध असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ‘२००८ मध्ये सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला. काही काळ शिवसेनेचे प्रवक्ते म्हणूनही त्यांनी काम केलं. सचिन वाझेंचे शिवसेनेबरोबर खूप चांगले संबंध होते. शिवसेनेच्या सक्रिय नेत्यांबरोबर त्यांचे व्यावयासिक संबंधही होते.

काही कंपन्याही त्यांनी तयार केल्या. जेव्हा उद्धव ठाकरेंचं सरकार आलं, तेव्हा पुन्हा एकदा सचिन वाझेंना सेवेत घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांचे काही प्रमुख मंत्रीही माझ्याकडे आले होते,’ असा खुलासाही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!