Share

दोनच दिवसात तब्बल १४१ व्यापारी पॉझिटिव्ह

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : जिल्हा व्यापारी महासंघाच्या सहकार्याने महापालिकेकडून शहरातील व्यापार्‍यांची कोरोना चाचणी केली जात आहे. सोमवारी (दि.१५) याअंतर्गत सहा ठिकाणी अ‍ॅन्टिजेन टेस्ट शिबिर सुरु करण्यात आले. यात सर्व केंद्रांवर सोमवारी दिवसभरात ७७५ व्यापार्‍यांची टेस्ट करण्यात आली. यातून ८० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह निघाले. तर मंगळवारी ७१६ चाचण्यांतून ६१ असे दोन दिवसांत एकूण १४१ व्यापारी पॉझिटिव्ह निघाले आहेत.

औरंगाबाद शहरात कोरोना संसर्ग गतीने फैलावत असल्याने व्यापारी, हातगाडीचालक, फळ-भाजी विक्रेते यांच्या कोरोना चाचण्या पालिकेकडून केल्या जात आहे. याअंतर्गतच व्यापार्‍यांच्या चाचणीसाठी शहरात सहा ठिकाणी स्वतंत्र तपासणी शिबिराचे घेतले जात आहे. सोमवारी सर्वच केंद्रांवर तपासणी करुन घेण्यासाठी व्यापार्‍यांच्या रांगा लागल्याचे चित्र होते.

मंगळवारी दिवसभरात ७१६ व्यापार्‍यांची चाचणी करण्यात आली. त्यातून ६१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात एसएफएस स्कुलमध्ये १२, पैठण गेट येथे ८, महावीर भवन येथे ९, शहागंज येथे १३, पाटीदार भवनमध्ये ६ तर अग्रेसन भवन येथे १३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. दोनच दिवसांत १४१ व्यापारी पॉझिटिव्ह निघाल्याने व्यापारी वर्गातूनही कोरोनाचा संसर्ग फैलावत चालला असून त्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी हा उपाय उपयोगी ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!