🕒 1 min read
मुंबई : मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी झाली आहे. त्यांच्या जागी राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अटकेत असलेले मुंबई पोलीस दलातील निलंबित API सचिन वाझे यांच्या स्फोटक प्रकरणात महाराष्ट्र पोलीस दलात ही मोठी घडमोड घडली आहे.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून परमबीरसिंग यांची उचलबांगडी होणार अशी जोरदार चर्चा होती. ती अखेर खरी ठरली आहे. महत्त्वाचं म्हणजे परमबीर सिंग यांना साईडलाईन करण्यात आलं आहे. त्यांना होमगार्ड म्हणजेच गृहरक्षक दलाचं जबाबदारी देण्यात आली आहे.
हेमंत नगराळे हे १९८७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. हेमंत नगराळे यांचा १९ महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. हेमंत नगराळे यांनी २०१६ मध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्त पदाचा कारभार स्वीकारला होता. त्यानंतर २०१८ मध्ये त्यांची नागपुरात बदली झाली. नगराळे सध्या पोलिस महासंचालक (विधी आणि तंत्रज्ञान) म्हणून कार्यरत आहेत.
हेमंत नगराळे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त असताना देशभर गाजलेल्या वाशीतील बँक ऑफ बडोदा दरोड्याची उकल अवघ्या दोन दिवसात केल्याने त्यांचे कौतुक झाले होते. १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धा, पॉप गायक जस्टीन बिबरच्या कार्यक्रमात चांगली कायदा-व्यवस्था ठेवल्याने त्यांना शाबासकीची थाप मिळाली होती. त्यांच्या काळात झालेली पोलीस क्रीडा स्पर्धाही राज्यात गाजली. कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे निलंबन, बडतर्फी, बदली करण्यातही ते अग्रेसर होते.
महत्त्वाच्या बातम्या
- मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाची फाईल अमित शहांकडे?; ठाकरे सरकारच्या अडचणी वाढणार
- ‘सर्वच नव्हे, ‘या’ सरकारी बँकांचेच होणार खासगीकरण’, सीतारमण यांची महत्त्वाची माहिती
- ‘स्व.गोपीनाथ मुंडेंनी भगवानगडाला सक्षम केले हा पंकजांचा गैरसमज’, नामदेव शास्त्री महाराजांची टीका
- वेदनेने विव्हळत अखेर ‘त्याने’ घाटीच्या पायरीवर सोडला प्राण
- पेट्रोलिंग करताना पोलिसांच्या गाडीचा अपघात, ७ जण जखमी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
