Share

फडणवीस थेट दिल्लीत पत्रकार परिषद घेणार; वाझे-हिरेन प्रकरणी नवा दावा करणार ?

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : अंबानी स्फोटक प्रकरणात सुरु असलेल्या चौकशीत प्रत्येक दिवशी नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. मुंबईमध्ये गाडीत स्फोटक सापडल्या प्रकरणी मुंबई पोलीस दलाचे निलंबित अधिकारी सचिन वाझे यांना राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणा अर्थात एनआयएने (NIA) अटक केली आहे. त्यांना २५ मार्च पर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे.

तर, राजकीय क्षेत्रात देखील या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील हे प्रकरण उचलून धरलं होतं. यामुळे, महाविकास आघाडी सरकारच्या अडचणीत देखील वाढ होत असल्याच्या दिसून येत आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस आज या प्रकरणी आणखी नवे दावे करण्याची शक्यता आहे.

विधानसभेत त्यांनी सीडीआरची माहिती मिळवत सचिन वाझेंवर आरोप केले होते. आता फडणवीस कोणते दावे करणार ? महाविकास आघाडी सरकारच्या अडचणी आणखी वाढणार का ? सचिन वाझे यांच्या संदर्भात ते आणखी काही नवा खुलासा करणार का ? असे सवाल उपस्थित होत असून ही पत्रकार परिषद दिल्लीतील भाजप मुख्यालयात संध्याकाळी ५.३० वाजता होणार आहे. यामुळे या पत्रकार परिषदेला आणखी महत्व प्राप्त झालं आहे.

वाझेंकडे ‘ती’ मर्सिडीज गाडी नाना पटोले आणि सचिन सावंत यांच्या मदतीने ?

दरम्यान, काल सचिन वाझे वापरत असलेली मर्सिडीज गाडी एनआयएने जप्त केली आहे. या गाडीतून एरवी बँकेत, दुकानात किंवा व्यापाऱ्यांकडून पैसे मोजण्यासाठी वापरण्यात येणार मशीन सापडलं आहे. तसेच, इतर काही वस्तू देखील सापडल्या आहेत.

यासंदर्भात भाजप नेते व आमदार ऍड. आशिष शेलार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ‘नाना पटोले आणि सचिन सावंत यांनीच ‘ती’ मर्सिडीज घेण्यासाठी सचिन वाझेंना मदत केली, अशी माहिती समोर येते आहे. चौकशी स्वतःकडे येते की काय या भीतीने काँग्रेस नेते भाजपावर बिनबुडाचे आरोप करत आहेत.’ असा घणाघात आशिष शेलार यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!