Share

आमदार गिरीश महाजन यांना कोरोनाची लागण

Published On: 

🕒 1 min read

जळगाव : भाजप नेते आणि आमदार गिरीश महाजन यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. जळगाव महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदासाठी १८ मार्चला निवडणूक होत आहे. त्यातच ऐन निवडणुकीच्या काळात भाजपच्या २७ नगरसेवकांचा पत्ता लागत नसल्याने वातावरण चांगलेच पेटले आहे.

भाजप नेते व गिरीश महाजन महापालिका राजकारणातील हि अडचण सोडविण्यामध्ये व्यस्त आहेत. यातच त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने भाजपाच्या अडचणीत वाढ झाली आहे. रविवारी रात्री गिरीश महाजन यांची जळगाव विमानतळावर नगरसेवकांसह बैठक झाली होती त्यादरम्यान देखील महाजन यांना ताप होता.

मंगळवारी महाजन यांनी तपासणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. महाजन यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असला तरी, ते काही राजकीय कामे रुग्णालयातूनच करत असल्याची माहिती समोर आली आहे.

कोरोनाची लस आली लसीकरण सुरु होऊन देखील दोन महिने उलटून गेले मात्र अद्याप देखील कोरोना आटोक्यात आला नसून राज्य कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर येऊन उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!