Share

बीडच्या अधिकाऱ्यांवर सुनिल केंद्रेकर संतापले, म्हणाले ‘सुधरा रे,अन्यथा..’

Published On: 

बीड : बीडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. विविध उपाययोजना करूनही कोरोनासमोर प्रशासन हतबल होताना दिसत आहे. त्याचबरोबर आता कोरोनासारख्या गंभीर स्थितीची सरकारी अधिकाऱ्यांना गांभीर्य नसल्याचेच दिसून येत आहे. आज बुधवारी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी सर्वच बेजबाबदार अधिकाऱ्यांची त्यांनी चांगलीच खरडपट्टी काढली. यावेळी त्यांनी ‘व्यवस्थित काम करा अन्यथा राजीनामे द्या’ असा इशारा अधिकाऱ्यांना दिल्याचे सुत्रांनी सांगितले.

बैठकीला जिल्हाधिकारी रविंद्र जगताप, पोलीस अधीक्षक आर. राजा, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गीते यांच्यासह सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते. बीडमध्ये कोरोना चाचणी प्रयोगशाळा प्रस्तावित असून तातडीने सुरू करण्याचे निर्देश केंद्रेकर यांनी दिली. तसेच, आरटीपीसीआर चाचणीवर भर द्यावा. ऑक्सिजन उपलब्धता करा. हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. मास्क नसल्यास वेळप्रसंगी बेजाबदार नागरिकांना ‘प्रसाद’ द्या असेही त्यांनी पोलिसांना सांगितले. तसेच माध्यम नियंत्रणासाठी अधिकारी असायला हवा असे मतही आयुक्त केंद्रेकर यांनी व्यक्त केले.

अंबाजोगाई तालुक्यात कोरोना रुग्ण रस्त्यावर मोकाट फिरत असल्याचे समोर आले होते. या प्रकारावरून सुनिल केंद्रेकर चांगलेच संतापले. अशा रुग्णांसह जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात कारवाईचे निर्देश त्यांनी आढावा बैठकीत दिले. दरम्यान, बीड जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये २६६ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहेत. अंबाजोगाई ६०, आष्टी ९, बीड १००, धारूर ४, गेवराई १८, केज ८, माजलगाव ३५, परळी १५, पाटोदा ९, शिरूर ४  आणि वडवणीतील चार रुग्णांचा यात समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!