🕒 1 min read
कोलकाता : पश्चिम बंगाल मध्ये जसा निवडणुकीचा बिगुल वाजला तसाच भाजपा आणि तृणमूल कॉंग्रेस यांच्यातील संघर्ष देखील वाढू लागला. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरुवातीच्या टप्प्यातच हिंसक बनला आहे.
नंदीग्राममधून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ममता बॅनर्जी एका मंदिरात गेल्या आणि तेथून बाहेर आल्यावर त्या कारजवळ उभ्या होत्या. तिथे थांबून त्या कार्यकर्त्यांशी बोलत होत्या. त्यानंतर त्या कारमध्ये बसत असताना दरवाजा आतील बाजूस ढकलला आणि यातच त्यांच्या पायाला दुखापत झाली. या प्रकारानंतर त्यांना ताबडतोब कोलकात्याला आणण्यात आले होते.
नंदिग्राम येथे प्रचारादरम्यान जखमी झाल्याने मोठ्या राजकीय वादाला तोंड फुटले होते. आपल्यावर प्रतिस्पर्धी भाजपाकडून हल्ला करण्यात आल्याचा दावा ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसकडून करण्यात येत होता. तर ममता बॅनर्जी ह्या खोटे बोलत असल्याचा दावा भाजपाकडून येत होता.
त्यांनतर आता टीका भाजप नेते संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दासपूर येथील निवडणूक प्रचारसभेत बोलताना मामातांवर निशाणा साधला आहे. गरीब, आदिवासी, दुर्लक्षित समाजासाठी केंद्र सरकारने बनवलेल्या योजना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यात लागू केल्या नाहीत. त्यांच्यामुळेच पश्चिम बंगालचा विकास थांबला,पश्चिम बंगालमध्ये एकदा भाजपचे सरकार स्थापन करा, मग टोलेबाजी करण्याची किंवा कट मनी घेण्याची कुणाचीही हिंमत होणार नाही. भाजप सरकारच्या काळात कुणीही कोणत्याही राजकीय कार्यकर्त्याची हत्या करू शकणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. ममता यांनी सांगितले होते की, ‘माँ, माटी और मानुष’! पण आज इथे ना माँ सुरक्षित आहे, ना मानुष सुरक्षित आहे, ना पश्चिम बंगालची माती सुरक्षित आहे, असा टोला देखील सिंह यांनी लगावला.
महत्वाच्या बातम्या
- बँकांच्या खासगीकरणावरून खासदार राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा
-
धक्कादायक : भाजपच्या लोकप्रिय खासदाराचा संशयास्पद मृत्यू; भाजपच्या संसदीय मंडळाची आजची बैठक रद्द
- भोजपुरी अभिनेता निघाला दुचाकी चोर; दिल्ली पोलिसांनी केली अटक
- फुलराणीचे ३१व्या वर्षात पदार्पण…
- ‘My Men in frame’ लहान भाऊ, करीना आणि सैफसाठी तैमुरने बनवला खास पदार्थ !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
