Share

शरद पवारांच्या भेटीमध्ये फक्त हवा-पाण्याच्या गप्पा झाल्या – संजय राऊत

Published On: 

🕒 1 min read

दिल्ली : मुंबईमध्ये गाडीत स्फोटक सापडल्या प्रकरणी मुंबई पोलीस दलाचे निलंबित अधिकारी सचिन वाझे यांना राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणा अर्थात एनआयएने (NIA) अटक केली आहे. सचिन वाझेंना २५ मार्च पर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली असून या प्रकरणामुळे राजकीय क्षेत्रात देखील मोठी खळबळ उडाल्याचे दिसून आलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापासून ते महाविकस आघाडीतील विविध नेत्यांच्या बैठका होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कालच उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. यानंतर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे देखील ठाकरेंच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर गेले होते. दरम्यान, आज देखील विविध पोलीस अधिकारी आणि सरकारमधील नेत्यांच्या भेटीगाठीचं सत्र सुरुच आहे.

महाविकास आघाडीमधील दोन मास्टरमाईंड नेते म्हणजेच शरद पवार आणि शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांची आज दिल्लीमध्ये भेट झाली आहे. राज्यातील घडामोडींमुळे या भेटीमध्ये काय चर्चा होणार याबाबत राजकीय क्षेत्राचं लक्ष लागलं होतं. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल अर्धा तास बैठक झाली आहे.

या भेटीनंतर माध्यमांनी संजय राऊत यांना या भेटीमागील कारणाबाबत विचारणा केली. यावेळी संजय राऊत यांनी, ‘आजच्या भेटीमध्ये फक्त हवा-पाण्याच्या गप्पा झाल्या’ असं मिश्किल उत्तर त्यांनी दिलं आहे. तसेच, ‘गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याबाबत बोलण्यास मी योग्य व्यक्ती नाही,’ असं देखील ते म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!