🕒 1 min read
जालना : जालना तालुक्यातील दरेगाव शिवारात एक हळहळ व्यक्त करणारी घटना घडली आहे. एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या तरुण-तरुणीने औरंगाबाद येथून हैदराबादकडे जाणाऱ्या मनमाड-काचीगुडा या धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास दरेगाव शिवारातील रेल्वे रुळावर घडली.
तुषार प्रेमानंद रगडे (वय २०, चंदनझिरा), शितल शरद कान्हे (वय १९, पांगरखेडा, ता.अंबड) अशी मृतांची नावे आहेत. या आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. मात्र, प्रेमप्रकरणातून त्या दोघांनी हे पाऊल उचलले असावे असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळी आढळलेल्या एका बॅगेतून मिळालेल्या कागदपत्रांवरून दोघांची ओळख पटली आहे.
दरेगाव शिवारात मनमाड-काचीगुडा एक्स्प्रेसखाली येऊन एक तरुण व एक तरुणी ठार झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी चंदनझिरा पोलिसांना दिली. माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर, चंदनझिरा ठाण्याचे पोलिस निरीक्षक यशवंत जाधव हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. तरुण-तरुणीचे मृतदेह रेल्वे रुळावर छिन्नविच्छिन्न झाला होता.
पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले. घटनास्थळी आढळलेल्या एका बॅगेतून मिळालेल्या कागदपत्रांवरून दोघांची ओळख पटल्याची माहिती पोलिस निरीक्षक यशवंत जाधव यांनी दिली. दरम्यान, याप्रकरणी चंदनझिरा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादीचे बॅनर, ‘सब जगह से पड रही है मार, धन्यवाद मोदी सरकार!’
- दडपशाही! शरद पवारांच्या बारामतीला निघण्यापूर्वीच साष्टपिंपळगावच्या आंदोलकांना अटक
- ‘भाजपला लोक कंटाळले आहेत, काँग्रेस पुन्हा एकदा राज्यात नंबर एकचा पक्ष बनेल’
- प्रवीण अमरे यांना दिल्ली कॅपिटलमध्ये मिळाली ‘ही’ जबाबदारी
- प्रथमेश माने बनला ‘महाराष्ट्रज बेस्ट डान्सर’; प्रेक्षकांचे मानले आभार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
