Share

बुमराहला शुभेच्छा देताना मयांक अग्रवालने केली ‘हि’ मोठी चूक ; सोशलवर होतोय ट्रोल

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : ज्याप्रमाणे बॉलीवूड कलाकार आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीमागे काही तरी गुप्त योजना असल्याच्या चर्चा असतात त्याच प्रमाणे क्रिकेटर्सच्या देखील जीवनाबद्दल माध्यामांमध्ये चर्चा असतात आता देखील अशीच एका खेळाडूच्या सुट्टी दरम्यान एक बातमी आली आहे. आता भारतीय संघातील आणखी एका मोठ्या खेळाडूचा विवाह झालाआहे.

यामध्ये काही जण गुपचूप लग्न उरकून घेतात तर काही मोठ्या थाटामाटात लग्न करतात. विराट कोहली, युवराज सिंग, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना, आर.आश्विन यांचा लग्नसोहळा म्हणजे चाहत्यांसाठी एक आकर्षण होतं. आपल्या भेदक गोलंदाजीने जगभरातील फलंदाजांची दाणादाण उडवणारा भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह आता लग्नबंधनात अडकला आहे.

बुमराहने लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. बीसीसीआयपासून ते भारतीय क्रिकेटपटूंनी त्याला शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छा देताना एका क्रिकेटपटूकडून मात्र मोठी चूक झाली.

भारतीय कसोटी संघातील स्टार फलंदाज मयांक अग्रवालने देखील अन्य क्रिकेटपटूंप्रमाणे बुमराह आणि संजना यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. पण या शुभेच्छा देताना मयांककडून एक चूक झाली. या चुकीचा स्क्रीनशॉट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर जो स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. त्यानुसार मयांकने बुमराह आणि संजना यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. पण त्या देताना त्याने चुकून संजना गणेशनच्या ऐवजी संजय बांगर यांना टॅग केले. मयांकला ही चूक लक्षात आल्यानंतर त्याने लगेच संबंधीत पोस्ट डिलिट केली. त्यानंतर नव्याने शुभेच्छा देणारे ट्विट केले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!