🕒 1 min read
पुणे : भारत-इंग्लंडदरम्यानची टी-20 क्रिकेट मालिका म्हणजे टी-20 क्रिकेट विश्वचषकासाठी संघाची मोर्चेबांधणी सुरू असल्याने नव्या दमाचे खेळाडू स्वतःला सिद्ध करण्यासाठी आतूर आहेत. इशान किशनने पदार्पणाच्या लढतीत अर्धशतक ठोकून ती झलक दाखवली आहे. भारत-इंग्लंड यांच्यातील तिसरा सामना मंगळवारी रंगणार आहे. त्यामुळे इशानसह सूर्यकुमार यादव, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर कशी कामगिरी करणार याकडे सर्व क्रिकेटप्रेमींच्या नजरा आहेत.
पाच सामन्यांच्या या मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये वन डे मालिका रंगणार आहे. पुण्यात होणाऱ्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेसाठी भारतीय संघाची लवकरच घोषणा केली जाणार आहे. यामध्ये टी 20 प्रमाणे वन डे मालिकेत नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची चिन्हं आहेत. कर्नाटकचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा आणि बडोद्याचा अष्टपैलू कृणाल पंड्या यांना वन डे संघात संधी मिळण्याची शक्यता आहे.
क्रिकबज या वेबसाईटच्या माहितीनुसार, गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा पहिल्यांदाच भारतीय संघात स्थान मिळवू शकतो. नुकत्याच झालेल्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत कृष्णाने 14 विकेट्स घेतल्या होत्या. कृष्णा हा आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळतो. कृष्णाशिवाय मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, टी नटराजन आणि भुवनेश्वर कुमार यांची निवड निश्चित मानली जात आहे. दरम्यान, या मालिकेत रवींद्र जाडेजाचं पुनरागमन होण्याची शक्यता कमी आहे.
महत्वाच्या बातम्या
- दडपशाही! शरद पवारांच्या बारामतीला निघण्यापूर्वीच साष्टपिंपळगावच्या आंदोलकांना अटक
- शरद पवारांनी अनिल देशमुखांना केले सेफ, डॅमेज कंट्रोल म्हणून परमबीर सिंहांची विकेट पडणार ?
- ‘भाजपला लोक कंटाळले आहेत, काँग्रेस पुन्हा एकदा राज्यात नंबर एकचा पक्ष बनेल’
- प्रवीण अमरे यांना दिल्ली कॅपिटलमध्ये मिळाली ‘ही’ जबाबदारी
- प्रथमेश माने बनला ‘महाराष्ट्रज बेस्ट डान्सर’; प्रेक्षकांचे मानले आभार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
