🕒 1 min read
मुंबई : दिवाण हाउसिंग फायनान्स लिमिटेड कंपनीने (DHFL) केलेल्या कर्ज घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) काँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे जावई राज श्रॉफ यांची अंधेरीतील सुमारे ११ हजार चौरस फुटांची स्थावर मालमत्ता जप्त केली.
राज श्रॉफ यांच्या या मालमत्तेची किंमत ३५.४८ कोटी असल्याचे सांगण्यात येते. एचडीआयएल प्रमोटर्सच्या वाधवान बंधुंनी केलेल्या हजारो कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे समजते.
ED attaches commercial properties worth Rs. 35.48 Crore belonging to Raj Shroff and his wife, owners of M/s Jindal Combines Pvt. Ltd & M/s Orlando Trading Pvt. Ltd. under PMLA in Bank Fraud case.
— ED (@dir_ed) March 15, 2021
पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) दीवाण हाउसिंग फायनान्स लिमिटेडला दिलेलं 3,688.58 कोटी कर्जाला घोटाळा घोषित केलं आहे. येस बँकेतील घोटाळ्याबाबतही या कंपनीची चौकशी सुरु आहे. डीएचएफएलचे प्रवर्तक राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांनी पीएमसी बँकेत केलेल्या कर्ज घोटाळ्याच्या अनुषंगाने मनी लाँडरिंगचाही गुन्हा दाखल आहे. त्याच गुन्ह्यात मेसर्स जिंदल कंबाइन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मेसर्स ओरलँडो ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांचे मालक असलेल्या प्रीती व राज श्रॉफ यांच्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
प्रीती श्रॉफ कॉंग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांची कन्या असून अंधेरी पूर्व येथे कालेडोनिया या इमारतीत प्रीती व राज यांच्या मालकीच्या जवळपास ११हजार ५५० स्क्वेअर फिटच्या दोन कमर्शियल मालमत्ता असून त्या ईडीने जप्त केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘महाराष्ट्राने संयम सोडला तर कानडी राज्यास जबरदस्त किंमत मोजावी लागेल’
- संसदेत घुमला पुण्याचा आवाज, चव्हाण-बापटांनी गाजवला दिवस
- सचिन तेंडुलकर ‘हा’ पराक्रम करणारा एकमेव क्रिकेटपटू
- ‘मोठे शौर्य गाजविले या भ्रमात त्या कानडी संघटनांनी राहू नये’
- ‘एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ कर्नाटकचे मुख्यमंत्री व देशाच्या पंतप्रधानांकडे घेऊन जाच’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
