Share

संसदेत घुमला पुण्याचा आवाज, चव्हाण-बापटांनी गाजवला दिवस

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली- काल संसदेत पुण्याचा आवाज घुमला. पुण्याचे खासदार गिरीश बापट आणि राज्यसभेतील खासदार वंदना चव्हाण यांनी विविध मुद्यांवर भाष्य करत सरकारचे लक्ष्य वेधले. गिरीश बापट यांनी रेल्वेच्या मुद्यावर भाष्य केले तर वंदना चव्हाण यांनी वैवाहिक बलात्कारांचा मुद्दा मांडत भारतात वैवाहिक बलात्कार हा गुन्हा का मानला जात नाही? असा प्रश्न उपस्थित केला.

रेल्वे अर्थसंकल्पावर लोकसभेत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान बापट यांनी पुणे विभागातील रेल्वेच्या समस्याही सभागृहात मांडल्या. राज्य सरकारने पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वेने जोडण्याचा प्रस्ताव मंजूर केल्याने रेल्वे मंत्रालयाने 231 किलोमीटरच्या या मार्गाचे काम तातडीने सुरू करावे अशी मागणी काल बापट यांनी लोकसभेत केली.
मुंबई-पुणे-नाशिक ही तीन औद्योगिक शहरे रेल्वेने जोडण्याबाबत बरीच वर्षे चर्चा चालू आहे. त्यापैकी पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वेने जोडण्यास राज्याकडून हिरवा कंदील मिळाला आहे. म्हणून रेल्वे मंत्रालयाने हे काम तातडीने सुरू करावे. अशी पुणेकरांची मागणी आहे. तसेच विविध प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी केंद्र आणि राज्य सरकार यामध्ये सुसंवाद व सुसूत्रता आणण्याची गरज असल्याचे बापट यांनी सांगतले आहे.

संवाद नसल्यामुळे राज्यातील अनेक प्रकल्प प्रलंबित राहिले आहेत. विशेषतः पुणे मिरज लोंढा हा 467 किलोमीटरचा मार्ग 2015- 16 या वर्षात मंजूर झाला आहे. तथापि भूसंपादन न झाल्याने हा प्रकल्प रेंगाळला आहे. तसेच पुण्याहून लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांची संख्या वाढविण्याची गरज आहे असे बापट म्हणाले.

दुसऱ्या बाजूला खासदार वंदना चव्हाण यांनी राज्यसभेत जगातील १०० हून अधिक देशांमध्ये वैवाहिक बलात्कार हा गुन्हा मानला जातो. ज्या ३६ देशांमध्ये हा गुन्हा मानला जात नाही, त्यापैकी भारता हा एक देश असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

अनेक वर्षांपासून वैवाहिक बलात्काराचा गुन्हेगारीकरण करण्याची गरज असल्याची मागणी अनेक स्तरांतून होत आहे. वैवाहिक बलात्कार हा गुन्हा ठरवावा, अशी विचारणा  करणाऱ्या अनेक महिला संघटना आहेत. लॉकडाउननंतर अश्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे आणि त्यामुळे या प्रश्नाकडे गंभीरपणे लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे अध्यक्ष वैंकय्या नायडू यांना वंदना चव्हाण यांना विनंती केली की, “ देशातील लाखो बहिणी व मुलींचा एक अत्यंत संवेदनशील भाऊ आणि वडील म्हणून मी तुमच्याकडे पाहते. या विषयावर पुन्हा लक्ष देवून, पुन्रविचार-विनिमय करून, वैवाहिक बलात्काराचा गुन्ह्याचा कायदा पारित करुन घेण्यासाठी आपण शासनाला सूचना द्याव्यात.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!