🕒 1 min read
औरंगाबाद : शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांमध्ये लहान मुलांची संख्या वाढत असून, ही चिंतेची बाब बनली आहे. कोरोनाबाधितांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्याही आता दहा हजारांच्या पुढे गेली आहे. जानेवारी महिन्यात नियंत्रणात असलेली कोरोनाबाधितांची संख्या फेब्रुवारी महिन्यापासून वाढू लागली. १५ फेब्रुवारीनंतर दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली.
रोज तीनशे किंवा त्यापेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. शहरात रुग्णांची दैनंदिन संख्या ५०० च्या पुढेच आहे. एकाच दिवसात इतके रुग्ण आढळल्यामुळे हा वाढता संसर्ग थोपवण्याचे आव्हान पालिकेच्या प्रशासनासमोर आहे.
महापालिकेकडून जिल्हा प्रशासनाला पाठविल्या जाणाऱ्या अहवालातील आकडेवारीनुसार, शहरात शून्य ते पाच वयोगटातील ६६३ मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर पालिकेच्या कोव्हिड केअर सेंटरसह विविध खासगी दवाखान्यांत उपचार करण्यात आले आहेत. कोरोनाबाधितांमध्ये लहान मुलांची ही संख्या जास्त असल्याचे आरोग्य विभागाचे मत आहे. पन्नास आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या १०,७६१ व्यक्तींना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.
रोज ७५ ते १२५ च्या दरम्यान कोरोनाबाधित झालेले ज्येष्ठ नागरिक आढळत आहेत. पाच ते अठरा वयोगटातील ४१६१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. १८ ते ५० या वयोगटातील २१ हजार ३४८ जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. या वयोगटातील कोरोनाबाधितांमुळेच लहान मुले व ज्येष्ठ नागरिक कोरोनाबाधित होत आहेत, असे आरोग्य विभागातील सूत्रांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- एक बार जो मैंने…म्हणत सलमानने जाहीर केली राधेची रिलीज डेट
- लसीचे दोन डोस घेऊनही घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर कोरोना पोझीटीव्ह
- सहा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा मोक्कातील आरोपी जेरबंद
- कोरोना वाढला! बीड जिल्ह्यात सायंकाळी ७ ते सकाळी ७ पर्यंत कर्फ्यू लागू
- ” ‘ते’ पाऊल उचलण्याआधी डेलकरांनी मोदी-शाहांना पत्र लिहिलं होतं, मात्र…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
