Share

” ‘ते’ पाऊल उचलण्याआधी डेलकरांनी मोदी-शाहांना पत्र लिहिलं होतं, मात्र…”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ‘दादरा, नगर हवेलीचे सातवेळा निवडून आलेले लोकप्रिय खासदार मोहन डेलकर यांना भाजप नेते आणि केंद्रीय प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या छळामुळे आत्महत्या करावी लागणे ही भारतीय लोकशाहीसाठी शोकांतिका आहे. आत्महत्या करण्यापूर्वी देशातील सर्व ताकदवर व संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तींचा दरवाजा डेलकर यांनी मदतीची आर्त याचना करून ठोठावला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह लोकसभा अध्यक्षांना वारंवार पत्र लिहून मदतीची याचना केली होती, असं भाष्य काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी करत भाजपला लक्ष्य केलं आहे.

‘भाजपच्या एकाही नेत्याने मोहन डेलकर आत्महत्याप्रकरणी दुःख व्यक्त केलं नाही. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात बोलत होते, पण एका खासदाराचा मृत्यू झाला तेव्हा त्याबाबत संवेदना नाही का?’ असा सवाल देखील सचिन सावंत यांनी केला आहे. तर, ‘डेलकर यांनी पंतप्रधान, गृहमंत्री आणि लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून मदतीची याचना केली होती, परंतु त्यांना कोणतीही मदत केली नाही,’ असा दावा सावंत यांनी आज मुंबईतील पत्रकार परिषदेत आहे.

डेलकर यांचा मदतीसाठी पत्रव्यवहार !

डेलकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि लोकसभा अध्यक्ष यांना पत्र लिहून मदतीची विनवणी केली होती, असं सावंत यांनी सांगितलं. ते म्हणाले, ‘डेलकर यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोन पत्र लिहिली होती. पहिलं पत्र 18 डिसेंबर आणि दुसरं 31 जानेवारी रोजी लिहिलं होतं. या पत्रात त्यांनी आपली याचना, होणारे अत्याचार, भाजप नेते आणि अधिकारी अपमान करतात याची माहिती दिली होती. शिवाय हे प्रत्यक्ष सांगण्यासाठी भेटीची वेळ मागितली होती, पण त्यांना भेट नाकारण्यात आली.’

तर, ‘देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनाही 18 डिसेंबर आणि 12 जानेवारी रोजी डेलकर यांनी पत्र लिहिलं होतं. एक खासदार मदत मागत असताना त्याला उत्तर दिलं नाही. याशिवाय लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना 18 डिसेंबर, 12 जानेवरी आणि 19 जानेवरी अशी तीन पत्र पाठवून मदत मागितली होती. मग कारवाई का केली नाही? जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं का?’ असे गंभीर सवाल सचिन सावंत यांनी उपस्थित केले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!