Share

#MPSC : मला अंधारात ठेऊन घेतलेला निर्णय घेतला गेलाय,याबाबत चौकशी करण्यात येईल – वडेट्टीवार

Published On: 

🕒 1 min read

पुणे- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर MPSC ची नियोजित परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर राज्यभरात विद्यार्थ्यांनी आक्रोश व्यक्त केला आहे. १४ मार्च ला नियोजित असलेली राज्यसेवा पूर्व परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलण्याचा चुकीचा निर्णय सरकारने घेतला असल्याची भावना विद्यार्थ्यांची आहे.

आयोगाने परीक्षा रद्द करण्यासंबंधीची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्धी पत्रकाद्वारे गुरुवारी जारी केली आहे. आयोगाने दिलेल्या पत्रात म्हटले की, राज्यांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणूनच वेगवेगळ्या जिल्हयांनी निर्बंध लावलेले आहेत. प्रस्तुत परीक्षेची सुधारित तारीख जाहिर करण्यात येईल असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सहसचिव यांनी परिपत्रकात म्हटले आहे.

दरम्यान,महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं 14 मार्चला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 पुढे ढकलल्यानं विद्यार्थी संतप्त झाले आहेत. हजारो विद्यालये, महाविद्यालये उपलब्ध असताना फिजिकल डिस्टंसिंग चे काटेकोरपणे पालन करत परीक्षा घेणं सहज शक्य असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी संतप्त झाले आणि रस्त्यावर उतरले आहेत. विरोधकांसह सर्वसामान्य नागरिक,विद्यार्थी देखील ठाकरे सरकारवर चौफेर टीका करू लागले आहेत.

सोशल मिडीयावरच नव्हे तर विद्यार्थी रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागल्याने सरकारवर दबाव वाढू लागला असल्याने आता सरकार MPSC च्या अधिकाऱ्यांना आता आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केले जाऊ लागले आहे. मंत्री विजय वडेट्टीवार यांनी यासंदर्भात ट्वीट केले असून माझ्या विभागाने मला न विचारता सचिव स्तरावरून परस्पर घेतलेला निर्णय आहे. मला याबाबत काही ही माहिती नाही. मला अंधारात ठेऊन घेतलेला निर्णय असल्याने याबाबत चौकशी करण्यात येईल असं त्यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!