Share

नारेगावात कचरा प्रश्न पुन्हा ‘पेटला’, ग्रामस्थांकडून आंदोलनाचा इशारा

Published On: 

औरंगाबाद : शहरातील कचऱ्याचा प्रश्न २०१८ पासून अधिक तीव्रतेने समोर आला. नारेगाव कचरा डेपोबाबत परिसरातील गावकऱ्यांना आंदोलन करावे लागले. त्यानंतर पालिकेने चार प्रकल्पाची घोषणा केली होती. या आंदोलनामुळे औरंगाबादचा कचराप्रश्न त्यावेळी राज्यभर गाजला. त्यानंतर नारेगाव डेपोत कचरा टाकणे महापालिकेने बंद केले. मात्र येथील कचरा अद्यापही तसाच पडून आहे. त्यातही या परिसरातील अनधिकृत व्यापार्‍यांनी आजूबाजूचा कचरा तेथे नेऊन जाळण्याचे प्रकार सुरू केले आहे.

त्यामुळे येथील शेतकरी पुन्हा त्रस्त झाले आहेत. त्यामुळे आता या विरोधात पुन्हा कचरा आंदोलन पेटण्याचे संकेत शेतकर्‍यांनी दिले आहेत. पालिका प्रशासनाने कचराकोंडीनंतर शहराच्या चार बाजूंनी चार प्रकल्प प्रस्तावित केले आहेत. यातील पडेगाव, चिकलठाणा, कांचनवाडी येथील प्रकल्प सुरू झाले आहेत. तर हर्सूल प्रकल्पाचे काम सध्या सुरू आहे.

मात्र नारेगाव डेपो कचरा नष्ट करण्याकडे प्रशासनाने अद्यापही लक्ष दिलेले नाही. तसेच काही कचरा आताही नारेगाव येथील डेपोत नेऊन टाकत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी माहिती केला. या विरोधात दोन दिवसांपूर्वी मुक्ताई चौक, कचरा डेपो चौफुली येथे बैठक पार पडली. यात नारेगाव येथील कचर्‍या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय मंजूर करण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!