Share

MPSCने तारखा घोषित करताना सरकारला विश्वासात घेतलं नाही : वडेट्टीवार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं १४ मार्चला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२० पुढे ढकलल्यानं विद्यार्थी संतप्त झाले आहेत. पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी संतप्त झाले आणि रस्त्यावर उतरले आहेत. लोकसेवा आयोगाच्या निर्णयाचा विरोध करत विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केलं आहे.

पोलिसांनी विद्यार्थ्यांवर सौम्य लाठीमार देखील केला आहे. आजचं MPSC परीक्षेबाबत आजच निर्णय होणार असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली. ‘मुख्यमंत्र्यांशी याविषयासंदर्भात चर्चा झाली आहे.
माननीय मुख्यमंत्र्यांनी मान्य केले आहे कि विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. परंतु याबाबत एमपीएससीने तारखा घोषित करत असताना महाराष्ट्र सरकारला विश्वासात घेतल नाही. ज्या व्यवस्था करायच्या त्याच्या साठी सरकारला विश्वासात घेतल नाही. असे मोठे वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

परीक्षा पुढं ढकलणं हा निर्णय ८० टक्के विद्यार्थ्यांवर अन्याय करणारं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं परस्पर तारखा जाहीर केल्या. कोरोनासंदर्भात काळजी घेण्यासाठी कमी वेळ लागेल. मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेऊन निर्णय जाहीर करणार आहेत अशी माहिती सध्या मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!