🕒 1 min read
औरंगाबाद: जिल्ह्यात गुरुवारपासून अंशतः लॉकडाऊन सुरु झाले आहे. यासंबंधीचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी ७ मार्चला रोजी दिले होते. या दरम्यान जाधववाडी येथील भाजीमंडई सात दिवस बंद ठेवण्यात येणार आहे असे आदेशही काढण्यात आले होते. यावर मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी एका स्थानिक वृत्तपत्राला बोलताना, ‘जाधववाडीतील भाजीमंडईत मोठी गर्दी जमत असल्याने तेथून संसर्गाचे प्रसार होण्याची भीती आहे. त्यामुळेच प्रशासनाने सात दिवस हा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखणे व लोकांचे जीव वाचवण्यास आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. १५ दिवस कुणी भाजी खाल्ली नाही किंवा विकली नाही तर कुणी मरणार नाही.’ असे वक्तव्य केले होते.
या वक्तव्यावरून शेतकरी चांगलेच आक्रमक झालेले पहायला मिळाले. तर सोशल मीडिया वर देखील आयुक्तांना मोठ्या प्रमाणात टीकेचा सामना करावा लागला. यासोबतच शेतकऱ्यासोबत प्रशासनाने केलेला दुजाभाव देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून समजून सांगण्यात आला. यावर बोलताना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींनी मनपा आयुक्तांच्या त्या वाक्यावर काहीच बोलावसं वाटत नाही असं बोलून आयुक्तांच्या त्या वाक्याचा निषेधच केला.
भाजीमंडई बंद केली तर केली त्याला पर्यायी व्यवस्था सुद्धा केलेली नाही. शेतकऱ्यांचे सात दिवसात होणाऱ्या नुकसानाची भरपाई द्यावी अन्यथा त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यायला हवी. भर लॉकडाऊन मध्ये सुद्धा पर्यायी जागा आणि ठराविक वेळेत आपण बाजार चालू ठेवला होता, तसाच निर्णय पुन्हा घ्यायला हवा. आयुक्तांच्या वाक्यावर काहीच बोलाव वाटत नाही.
राधाकिसन पठाडे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती
आयुक्तांच स्टेटमेंट खूपच बालिश आणि बेजबाबदारपणाच वाटतं. भाज्या खाल्या किंवा नाही खाल्या तर कुणी मरणार नाही. पण, शेतकरी मात्र एवढ्या दिवसात कोलमडून पडेल. खर तर ही व्यवस्था शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला पिळवून काढणारी आहे. कारखाने, व्यापार, हॉटेल, बार यांना अंशतः बंधन घालत पूर्णतः मोकळीक आणि गरीबाच्या पोटावर पाय देऊन उद्योगपती, धंनदांडग्याचं भलं करणारी व्यवस्था आहे. प्रशासनाने कठोर निर्णय घ्यावा पण सर्वाना समान बंधन घालावी.
नवनाथ मंडलिक, शेतकरी पुत्र
आधीच इथे महागाई वाढली आहे, मंडई बंद होणार हा निर्णय जाहीर झाल्यापासूनच दारावर येणारे भाजी विक्रेते मंडई बंद होणार हे सांगून चढ्या दराने भाजी विक्री करत आहेत. या भाज्याच घेणे परवडत नाही. त्यात १५ दिवस भाजी न करता डाळी करून खाणे सामान्यांना परवडणार नाही. मुळात आता लॉकडाऊनच परवडणार नाही. डाळींचे दर देखील गगनाला भिडलेले आहेत. आयुक्त साहेब कधी दुकानात जाऊन खरेदी करत नसणार त्यामुळे त्यांना या बाबी माहिती नसतील पण त्यांनी असे बोलणे चुकीचे आहे.
प्रियंका जाधव, गृहिणी
महत्वाच्या बातम्या
- MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय अतिशय दुर्दैवी : पंकजा मुंडे
- पालिकेच्या फिरत्या पथकांचा आता ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’वर भर
- सरकारने MPSCच्या विद्यार्थ्यांचं वाटोळंच करायचं ठरवलंय : राम सातपुते
- परभणीमध्ये कुऱ्हाडीने मारहाण करून पायाची बोटे तोडली
- MPSC परीक्षा पुढे ढकलून मराठा विद्यार्थ्यांना दिलासा दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार – शिवसंग्राम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
