Share

कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांनीच महापालिकेला घातला कोट्यवधींचा गंडा ?

Published On: 

कोल्हापूर : डी.वाय.पी सिटी मॉलमधील भाडयाने दिलेल्या मिळकती स्वतःच्या वापरात दाखवून कोल्हापूरचे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांनी महापालिकेचा करोडो रूपयांचा घरफाळा बुडवला आहे. हा जुना विषय असल्याचे ते सांगत आहेत. पण २०१४ ते २०२१ या कालावधीतील सुमारे १५ कोटी रूपयांचा घरफाळा कधी भरणार, हे जाहीर करून त्यांनी जुना विषय संपवावा, नेहमीप्रमाणे जनतेची दिशाभूल करू नये, असं आव्हान माजी खासदार व भाजप नेते धनंजय महाडिक यांनी दिलं आहे.

राजकीय द्वेषातून आणि खुनशी स्वभावातून ते नेहमीप्रमाणे आपल्या बगलबच्चांना पुढे करून, मुळ विषयाला बगल देत आहेत. थकीत १५ कोटी रूपयांचा घरफाळा कधी भरणार हे आधी पालकमंत्र्यांनी स्पष्ट करणे आवश्यक आहे. मात्र पालकमंत्री स्वतः बिळात लपून बसले असून, आपल्या बगल बच्चांना पुढे करत आहेत. पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार त्यांची हुजरेगीरी करणारे काहीजण पत्रकार परिषद घेवून, धादांत खोटे बोलत आहेत, असं देखील महाडिक म्हणाले आहेत.

आता तर महापालिका प्रशासनावर खापर फोडून स्वतःचा बचाव करण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. वास्तविक २४ ऑक्टोबर २०१४ रोजी महानगरपालिकेने डीवाय पाटील हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड यांना पत्र लिहून माहिती सादर करण्याबाबत कळवले होते. त्यानंतर १८ ऑक्टोबर २०१९ ला संजय ज्ञानदेव पाटील यांना महानगरपालिकेने पत्र पाठवून मिळकतीमधील भाडेवापर माहिती आणि करारपत्र सादर करण्याबाबत कळवले आहे. महापालिकेचे कर्मचारी घरफाळा आकारणीबद्दल गेल्यावर त्यांच्यावर दबाव टाकून दमदाटी केली जाते, असा आरोप देखील धनंजय महाडिक यांनी केला आहे.

पुढे ते म्हणाले, ‘पालकमंत्री आणि त्यांच्या कुटुंबियांनी महानगरपालिका प्रशासनाला कसलीही माहिती न देता, तब्बल १५ कोटी रूपयांची घरफाळा चोरी केली आहे. सर्व आकडेवारी आणि पुराव्यासह घरफाळा घोटाळा उघडकीस आणल्यानंतर पालकमंत्र्यांकडून मुळ विषय बाजूला ठेवून, केवळ दिशाभूल केली जात आहे. त्यासाठी त्यांनी केलेले आरोप हास्यास्पद आहेत. आजवर ज्यांनी महापालिकेच्या अनेक जमीनी लाटल्या, ते आता पुन्हा महापालिकेची आणि कोल्हापूरच्या नागरीकांची फसवणूक करत आहेत.’

‘राजकारणाचा आणि पदाचा गैरवापर करून, महापालिका प्रशासनावर दबाव टाकून घरफाळा चोरी करणाऱ्यांनी आपण सज्जन असल्याचा आव आणू नये. आम्ही आमची जी काही शासकीय करांची रक्कम आहे, त्याची पुर्तता करत असतो. पण पालकमंत्री महोदयांनी गेल्या सहा वर्षात सरळसरळ महापालिकेच्या तिजोरीवर एक प्रकारे दरोडा टाकला आहे. त्या बद्दल बोलण्याऐवजी हा जुना विषय आहे असे सांगून ते आमच्याबद्दल राजकीय द्वेष बुध्दीतून बिनबुडाची विधाने करत आहेत. जर पालकमंत्री महोदयच घरफाळा चोरी करत असतील, तर सामान्य जनतेने घरफाळा का भरायचा, असा थेट सवाल देखील धनंजय महाडिक यांनी उपस्थित केला आहे.

धनंजय महाडिक यांनी या मॉल मधील भाडे कराची माहिती सविस्तर मांडली आहे. डीवाय पाटील हॉस्पिटॅलिटी तर्फे सतेज पाटील, संजय पाटील, आमदार ॠतुराज पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांच्यामार्फत झालेल्या विविध भाडेकरारांची नोंदणीकृत यादी पुढीलप्रमाणे देत आहे.

भाडेधारकाचे नाव दरमहा सरासरी भाडे भाडेकराराची तारीख

१. शॉपर्स स्टॉप ९ लाख रूपये २५/११/२०१५

२. पीव्हीआर सिनेमा १ लाख २५ हजार रूपये २१/०८/२०१५

३. रिदम डायग्नोस्टिक ३ लाख रूपये २०/०२/२०१७

४. मॅकडोनाल्ड ४२ हजार रूपये २०१४

५. एस एफ टू ९ हजार रूपये २०१४

६. सिध्द असोसिएट ३४,५०० रूपये २४/१२/२०१४

७. शिल्पा राऊत ४१,४०० रूपये ३१/०७/२०१५

८. रिलायबल हॉस्पिटॅलिटी २५,८७५ रूपये २०/११/२०१४

९. संजय आणि विजय देसाई १,५३,४०० रूपये ०८/०८/२०१४

१०. रिलायबल हॉस्पिटॅलिटी २८,७५० रूपये २०/११/२०१४

११. सबवे १७,२५० रूपये २४/०४/२०१५

१२. अवनिश मिश्रा ९८,६७० रूपये ११/०२/२०१६

१३. आदित्य बिर्ला फॅशन १,२४,२०० रूपये २०/०५/२०१६

१४. वैशाली पाटील २८,७५३ रूपये २७/०३/२०१४

१५. संजय आणि विजय देसाई ३५ हजार रूपये २७/०३/२०१४

१६. रिलायबल हॉस्पिटॅलिटी २८,७५३ रूपये २७/०३/२०१४

१७. कर्ल रिटेल लिमिटेड १० हजार रूपये १५/०६/२०१९

१८. आदित्य बिर्ला फॅशन १,२४,२०० रूपये २०/०५/२०१६

१९. अश्विनी विक्रम नलवडे ५५,६५० रूपये २२/०५/२०१८

२०. ऍमवे इंडिया १,२१,२८५ रूपये २८/०५/२०१८

२१. हिरा बॅगज प्रा.लि. ७१,३९० रूपये १५/०५/२०१८

२२. सत्यजित आणि अभिजित पाटील ८२,८०० रूपये २७/०३/२०१४

२३. लंडन शेक्स १० हजार रूपये १३/०२/२०१९

२४. ओव्हर्स ऑफ रजवाडी ७,७०० रूपये १९/०२/२०१९

याशिवाय अन्य काही भाडेकरार झालेले असूनही, महापालिकेला त्याची माहिती न देता, पालकमंत्र्यांनीच महापालिकेचे करोडो रूपयांचे नुकसान केले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने संबंधीतांकडून घरफाळा वसुली करावी, अन्यथा आयुक्त, उपायुक्त आणि कर निर्धारक यांना उच्च न्यायालयात खेचले जाईल. तसेच जोपर्यंत पालकमंत्री आपला घरफाळा भरत नाहीत, तोपर्यंत कोल्हापूरच्या जनतेने घरफाळा भरू नये, या माझ्या आवाहनावर मी ठाम आहे. असं देखील महाडिक म्हणले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!