मुंबई : 22 वर्षीय पूजा चव्हाण या तरुणीचा वानवडी येथे संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणात शिवसेनेचे नेते संजय राठोड यांचे नाव समोर आल्याने एकच खळबळ उडाली.चौफेर टीका झाल्याने तसेच महाविकास आघाडीच्या अडचणी देखील वाढू लागल्याने रविवारी (२८ फेब्रुवारी )या प्रकरणात संजय राठोड यांना वनमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
गेल्या चार दिवसांपासून हा राजीनामा जरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे असला तरी कोणतीही कारवाई न केल्याने काल भाजपने त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं. यानंतर, आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या राजीनाम्यावर स्वाक्षरी केल्याची माहिती समोर आली होती. यानंतर, हा राजीनामा मंजुरीसाठी राज्यपालांकडे पाठवला जाईल असं सूत्रांकडून सांगण्यात येत होतं.
काही वेळापूर्वीच राज्यपाल कार्यालयाने संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंजूर केल्याची माहिती दिली आहे. यामुळे, आता पूजा चव्हाण प्रकरणी पुढील तपास कसा होणार ? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, शिवसेनेच्या वाट्याचं हे मंत्रिपद रिक्त झाल्यामुळे कोणत्या शिवसेना नेत्याची वर्णी लागणार ? यावरून अनेक नावांची चर्चा सुरु झाली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंत्रिपद दुसऱ्या नेत्याकडे सोपवणार की सद्याच्या कॅबिनेट मंत्र्यावरच कारभार देणार ? असा सवाल निर्माण होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘गब्बर सापडला, सरकारला गबरू कसा सापडत नाही?
- उद्धव ठाकरेंना बाबरी बाबतचं ‘ते’ वक्तव्य भोवणार ? अबू आझमींनी दिला इशारा
- …अन् विरोधी पक्षनेत्यांनी केले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिनंदन !
- मैदानात बेन स्टोक्स आणि विराट एकमेकांना भिडले; वादएवढा वाढला कि अंपायर्सनी…
- ‘जय श्रीराम’ची एलर्जी असल्यानेच शिवसेनेचा ममता बॅनर्जींना पाठींबा; भाजप आमदाराची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
